शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
4
अमेरिकेने केली इराणची कोंडी, इराणला चारही बाजूंनी अमेरिकेने घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ
5
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
7
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
8
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
9
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
10
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
11
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
12
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
13
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
14
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
15
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
16
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
17
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
18
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
19
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
20
रॉकेट बनलाय हा पेनी स्टॉक, ५ दिवसांत दिला ६१% परतावा; फक्त २० रुपयांवर भाव! तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

क्लोरिनमुळे खंगू लागल्या सोलापुरातील पाण्याच्या टाक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 10:10 IST

क्लोरिनच्या गॅसमुळे जलशुध्दीकरणास मदत होते. पण या गॅसमुळे पाण्याच्या टाक्या खंगत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देमहापालिकेचे नुकसान, गॅसमुळे बसतो सिमेंट, लोखंडाला फटकाजुळे सोलापुरातील जलवितरण केंद्राच्या परिसरात जमिनीलगत १३ एमएलडी साठवण क्षमतेच्या एकूण दोन पाण्याच्या टाक्या आहेतक्लोरिनच्या मात्रेमुळे पहिल्या टाकीचा स्लॅब खराब झाला होता. सात ते आठ वर्षांपूर्वी त्याची दुरुस्ती करण्यात आली

राकेश कदम 

सोलापूर : क्लोरिनच्या गॅसमुळे जलशुध्दीकरणास मदत होते. पण या गॅसमुळे पाण्याच्या टाक्या खंगत असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेची जुळे सोलापुरातील दुसरी पाण्याची टाकी अशाच पध्दतीने खंगली होती. या टाकीच्या दुरुस्तीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. जूनपर्यंत हे काम पूर्ण झाल्यास जुळे सोलापुरात आणखी १३ एमएलडी जादा पाणी साठविणे शक्य होणार आहे. 

जुळे सोलापुरातील जलवितरण केंद्राच्या परिसरात जमिनीलगत १३ एमएलडी साठवण क्षमतेच्या एकूण दोन पाण्याच्या टाक्या आहेत. पाणीपुरवठा अधिकारी संजय धनशेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुळे सोलापुरातील १३ एमएलडी क्षमतेची पहिली पाण्याची टाकी १९६४ साली बांधण्यात आली तर दुसरी १३ एमएलडी क्षमतेची पाण्याची टाकी १९८५ साली बांधण्यात आली होती. क्लोरिनच्या मात्रेमुळे पहिल्या टाकीचा स्लॅब खराब झाला होता. सात ते आठ वर्षांपूर्वी त्याची दुरुस्ती करण्यात आली. अमृत योजनेतून दुसºया टाकीचा स्लॅब, पिलर्स दुरुस्तीचे काम दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले. हे काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला दोन वर्षांची मुदत होती. त्यानुसार जून महिन्यात काम पूर्ण होईल. 

जुळे सोलापूर जलवितरण केंद्रावरुन शहराच्या बहुतांश भागाला पाणीपुरवठा होतो. सोरेगाव योजनेतून येणारे पाणी थेट या टाक्यांमध्ये सोडले जाते. पाकणी येथून येणारे पाणी एका टाकीत सोडले जाते. पण पाकणीतून येणारे पाणी गावठाण भागात वितरित होत येते. या केंद्रावर सध्या केवळ एकाच १३ एमएलडी टाकीत पाणी साठविले जात आहे. या टाकीतून दोन उंचावरील टाकीत पाणी सोडले जाते. तेथून ग्रॅव्हिटीने शहराच्या विविध भागात पाणीपुरवठा होतो. दुसºया टाकीचे काम पूर्ण झाल्यास जादा १३ एमएलडी पाणी साठवण होईल. वादळ, वारा, वीज टंचाईच्या काळात साठविण्यात आलेल्या पाण्याचा उपयोग होईल. 

क्लोरिनचा असाही  तोटा  शहरवासीयांना जंतूविरहित पाणी मिळावे यासाठी जलवितरण केंद्रांतील पाण्याच्या टाक्यांमध्ये पिवळ्या रंगाचा क्लोरिनचा गॅस सोडण्यात येतो. या क्लोरिनच्या गॅसमुळे पाण्याच्या टाक्यांचा स्लॅब खराब होतो. स्लॅबमधील लोखंडाच्या सळया गंजतात. पत्रा आणि स्लॅबच्या खपल्या निघतात आणि त्या थेट पाण्यात मिसळतात. 

कामाला गती हवी, नगरसेवकांची मागणीउन्हाळ्यापूर्वीच महापालिका प्रशासनाने दुसºया पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण करणे अपेक्षित होते. गेल्या दोन वर्षांपासून हे काम सुरू आहे. मे महिन्यात हे काम पूर्ण झाल्यास शहराला त्याचा मोठा फायदा होणार आहे. युआयडी योजनेतून साकारण्यात आलेल्या उंचावरील पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण झाले आहे. या टाकीत पाणी सोडण्याची चाचणी लवकरच घेतली जाणार आहे. 

पाईनलाईनलाही दणकाक्लोरिन गॅसमुळे पाण्याच्या टाक्यांसह पाईनलाईनही खराब होते. शहरातील अनेक पाईप खराब झाले आहेत़ महापालिकेचे कर्मचारी वारंवार ही यंत्रणा दुरुस्त करण्याचे काम करतात, असेही पाणीपुरवठा अधिकारी सिध्देश्वर उस्तुरगी यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाWaterपाणीwater shortageपाणीटंचाई