शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील बंद पडलेल्या  पाणीपुरवठा योजना सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 20:38 IST

सोलापूर : विविध कारणांमुळे बंद पडलेल्या दहा पाणीपुरवठा योजना टंचाईमुळे सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी टंचाई आराखड्यातून ...

ठळक मुद्देच्दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागात पाण्याची टंचाई दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना दुरुस्तीअभावी किंवा थकीत वीज बिलामुळे ज्या योजना बंद

सोलापूर : विविध कारणांमुळे बंद पडलेल्या दहा पाणीपुरवठा योजना टंचाईमुळे सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी टंचाई आराखड्यातून निधीचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

 जीवन प्राधिकरण योजनेकडील चार योजना व जिल्हा परिषदेकडील ६ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून टंचाई काळात पाणीपुरवठा सुरू करण्यात येत आहे. बंद पडलेल्या या योजनांच्या दुरुस्तीसाठी २ कोटी ७० लाखांची गरज आहे.  फेब्रुवारी अखेरपर्यंत या योजना कार्यान्वित करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 

 दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. दुरुस्तीअभावी किंवा थकीत वीज बिलामुळे ज्या योजना बंद आहेत, अशा योजना पुन्हा सुरू करण्यात येत आहेत.  या योजना सुरू केल्यास टँकरची गरज भासणार नाही, त्यामुळे या योजनांना निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. 

जीवन प्राधिकरण योजनेकडील आंधळगाव, नंदूर (ता. मंगळवेढा), कोळगाव (ता. करमाळा), कव्हे  या चार योजनांसाठी १ कोटी २० लाख रुपयांची गरज आहे.  जिल्हा परिषदेकडील १९ प्रादेशिक पाणीपुरवठ्यांपैकी ८ योजना सुरु आहेत. त्यातील ६ योजना दुरुस्तीअभावी बंद आहेत.  त्यात व्होळे, कोर्टी, बोरगाव, जेऊर, भाळवणी, लिंबोरे या योजनांचा समावेश आहे. या योजनांच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ५० लाखांची गरज आहे. या योजनांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिल्यास २५ गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. यामुळे ३६ टँकर देण्याची गरज भासणार नाही.

तलावात पाणी सोडण्याचे नियोजन च्दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागात पाण्याची टंचाई दिसून येत आहे. टंचाई काळात विविध योजनेचे पाणी तलावात सोडून ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.  त्यानुसार उत्तर सोलापूर तालुक्यातील गावडीदारफळ, पंढरपूर तालुक्यातील तिसंगी, मोहोळ तालुक्यातील आष्टी, सांगोला तालुक्यातील घेरडी तलावात विविध योजनेतून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयWaterपाणीdroughtदुष्काळ