शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

शेतकºयांचे उत्पन्न वाढीसाठी आता गावागावातील ‘वॉटर हिरो’ कष्ट घेणार

By appasaheb.patil | Updated: September 16, 2020 12:56 IST

पानी फाउंडेशनची समृद्ध गाव स्पर्धा; चार तालुक्यातील १०५ गावे ठरली स्पर्धेसाठी पात्र

सोलापूर : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या यशानंतर पानी फाउंडेशनने यावर्षी समृद्ध गाव स्पर्धा आयोजित केलेली आहे़ या स्पर्धेत चार तालुक्यातील १०५ गावांनी सहभाग नोंदविला आहे़ या गावांमध्ये होणारी निसर्गाची हानी थांबवून शेतकºयांना समृद्ध करण्यात येणार आहे़ सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा ही महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागातील पर्यावरण तसेच अर्थव्यवस्थेचा कायापालट करण्यासाठी योजली आहे. या स्पर्धेद्वारे गावागावातल्या पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेला एक समृद्ध वळण देतानाच गावकºयांना त्यांच्या स्वप्नातले गाव उभे करण्यासाठी सक्षम करणे हे उद्दिष्ट असल्याची माहिती पानी फाउंडेशनचे प्रादेशिक समन्वयक विकास गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

सन २०१६ पासून सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या मनसंधारण ते जलसंधारण प्रशिक्षणाच्या माध्यमातून गावं पाणीदार झाली़ आतापर्यंत पानी फाउंडेशनच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये जाऊन प्रशिक्षण करून गावागावात जलसंधारणाची कामे केली़ याचा प्रभाव म्हणून जिल्ह्यातील बहुतांश गावे टँकरमुक्त झाली़ गावागावात साचलेले पावसाचे पाणी कायम टिकून राहायचे असेल तर यापुढे जाऊन गावांनी एकत्रित विचार करणे गरजेचे आहे व तोच विचार घेऊन पानी फाउंडेशन या वर्षी समृद्ध गाव स्पर्धा २०२० आयोजित केली आहे. तालुकानिहाय सहभागी गावांची संख्या

  • - माढा - २६ गावे 
  • - उत्तर सोलापूर - २३ गावे
  • - करमाळा - २१ गावे
  • - बार्शी - ३४ गावे

------------स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या तालुकानिहाय गावांची नावे 

  • - करमाळा तालुका - सरपडोह, शेलगाव, फिसरे, साडे, सालसे, देवीचामाळ, खडकी, निंभोरे, कोंढेज, गोरेवाडी, हुलगेवाडी, विहाळ, रोशेवाडी, जातेगाव, कामोणे, तरटगाव, वंजारवाडी, कुंभारगाव, घारगाव, पोथरे, वीट. 
  • - माढा तालुका - मोडनिंब, जाधववाडी (मो.), बैरागवाडी, वरवडे, परितेवाडी, होळे (खु.), उजनी (मा.), उपळवटे, भेंड, पडसाळी, अंजनगाव (उ.), जामगाव, वडाचीवाडी (अ उ), वडाचीवाडी(उ बु), उपळाई (खु), लोंढेवाडी, विठ्ठलवाडी, मानेगाव, धानोरे, बुद्रुकवाडी, चिंचोली, शिंदेवाडी, सोलंकरवाडी, रोपळे (क), अकुलगाव, भोगेवाडी़
  • - बार्शी तालुका - धामणगाव (दुमाला), मांडेगाव, कोरफळे, उंबरगे, काळेगाव, इर्ले, अरणगाव, सुर्डी, मानेगाव, पानगाव, हिंगणी (आर), लाडोळे, मुंगशी (वा), चिंचखोपण, हत्तीज, मालवंडी, कासारी, राळेरास, देवगाव, तावडी, चिंचोली (ढेंबरेवाडी), पिंपरी (पान), यावली(त), खांडवी.
  • उपळाई ठोंगे, कळंबवाडी (पा), चुंब, श्रीपत पिंपरी, अंबाबाईवाडी, खडकोणी, मुंगशी (आर), रातंजन, शेलगाव (मारकड), रस्तापूर. 
  • उत्तर सोलापूर तालुका - बेलाटी, भागाईवाडी, हिरज, राळेरास, अकोलेकाटी, एकरुख, कवठे, खेड, गुळवंची, तरटगाव, तेलगाव (सीना), दारफळ गावडी, नंदूर, नान्नज, बाणेगाव, रानमसले, वडाळा, वांगी, शिवणी, समशापूर, हगलूर, नरोटेवाडी, कळमण.

---------या सहा स्तंभांवर चालणार काम...

  • मृदा आणि जलसंधारण
  • जलव्यवस्थापन आणि पाण्याचा ताळेबंद तयार करणे
  • जंगल आणि वृक्षांची लागवड व वाढ करणे
  • पौष्टिक गवताचे संरक्षित कुरण क्षेत्र तयार करणे
  • मातीचा पोत आणि आरोग्य सुधारणे आणि टिकविणे
  • प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न वाढविण्यासाठी आधारभूत पाया तयार करणे

--------------डिजिटल प्रशिक्षणावर भर....या स्पर्धेसाठी गावागावातील लोकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे़ वेदांत अ‍ॅपच्या माध्यमातून डिजिटल प्रशिक्षण देण्यावर यंदा भर देण्यात आला आहे़ आता सध्या गावामध्ये टेस्टिंगचे काम चालू आहे़ योग्य प्रशिक्षण देऊन गावं समृद्ध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न लोकचळवळीच्या माध्यामातून करण्यात येत असल्याचे उत्तर तालुका प्रमुख नितीन आतकरे यांनी सांगितले.

यंदा पानी फाउंडेशनच्या माध्यमातून गावे समृद्ध करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील चार तालुक्यातील १०५ गावे पात्र ठरली आहेत़ या गावात सहा स्तंभांनुसार कामे चालणार आहेत़ प्रामुख्याने निसर्गाची हानी थांबविणे अन् गावातील प्रत्येक शेतकºयाला समृद्ध करणे, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणे हे एकमेव ध्येय ठेवण्यात आले आहे़ - विकास गायकवाड,प्रादेशिक समन्वयक, पानी फाउंडेशन, सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाagricultureशेतीFarmerशेतकरी