शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भंगार बसेस महिलांसाठी पिंक टॉयलेट करणार; सोलापूर महापालिकेचा वेगळा उपक्रम

By appasaheb.patil | Updated: November 24, 2022 14:28 IST

या उपक्रमासाठी सामाजिक संस्था, संघटनांची मदतीबरोबरच सीएसआर फंड लागणार आहे, तोही उभा करण्यासाठी महापालिका चाचपणी करीत आहेत.

सोलापूर : शहरात महिला व पुरुषांसाठी टॉयलेटची संख्या म्हणावी तशी नाही. शिवाय आहेत त्या टॉयलेटची अवस्था फारच वाईट आहे. तर या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महापालिका प्रशासन आता कामाला सुरुवात करणार आहे. परिवहन विभागाच्या भंगार बसेसचे रूपांतर आता महिलांसाठी पिंक टॉयलेट करण्यात येणार आहे. तसेच, शहरातील आहेत, त्या टॉयलेटची अवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न होणार आहेत.

दरम्यान, या उपक्रमासाठी सामाजिक संस्था, संघटनांची मदतीबरोबरच सीएसआर फंड लागणार आहे, तोही उभा करण्यासाठी महापालिका चाचपणी करीत आहेत. आयुक्त शीतल तेली-उगले यांनी एकूणच परिवहन विभागाचा आढावा घेतला. चालू व बंद बसेसबाबतची माहिती जाणून घेतली. यावेळी पालिकेचे अधिकारी व परिवहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जेएनयूआरएम उपक्रमातून घेण्यात आलेल्या ९९ बसेस संदर्भातील विषय न्यायालयीन प्रक्रियेत आहे. त्यामुळे त्याविषयी आताच काही निर्णय घेऊ शकत नसल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

पुणे पॅटर्न राबविणार सोलापुरात...पुण्यात महापालिकेने एका कंपनीची मदत वापरातून बाद झालेल्या जुन्या बसचा वापर करून लेडीज टॉयलेटची निर्मिती केली आहे. या बसमध्ये वेस्टर्न आणि इंडियन दोन्ही प्रकराचे टॉयलेट तयार करण्यात आली आहेत. हा पुणे पॅटर्न सोलापुरात राबविण्यात येईल का? याबाबत माहिती घेण्यात येत आहे.

महापालिका आयुक्तांनी घेतला परिवहनचा आढावापरिवहन विभागाला ऊर्जावस्थेत आणण्यासाठी निधी, पैशाची गरज आहे. सध्या महापालिकेकडे आवश्यक तो निधी नाही, तरीही लोकांच्या दृष्टीने परिवहनची सेवा सुरू होणे महत्त्वाचे असल्याने त्याला पैसे देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, अशी माहिती आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिली.

२० चालू तर, ५९ बसेस दुरुस्तीअभावी बंदपरिवहन विभागांतर्गत सध्या शहरात विविध मार्गांवर २० बसेस धावत आहेत. त्यातून परिवहनला चांगले उत्पन्न मिळत आहे. उर्वरित ५९ बसेस दुरुस्तीअभावी बंद आहेत, त्या लवकर कशा चालू करता येतील यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :Solapur Municipalसोलापूर महानगरपालिकाSolapurसोलापूर