लाकडांवर वारली पेंटिंग; सोलापूर विद्यापीठात घ्या नॅचरल सेल्फी
By बाळकृष्ण दोड्डी | Updated: May 4, 2023 17:25 IST2023-05-04T17:24:30+5:302023-05-04T17:25:04+5:30
सेल्फी पॉइंटमुळे विद्यापीठ कॅम्पसच्या सौंदर्यात आणखीन भर पडल्याची भावना कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.

लाकडांवर वारली पेंटिंग; सोलापूर विद्यापीठात घ्या नॅचरल सेल्फी
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारती जवळील लॉनमध्ये 'नॅचरल सेल्फी पॉइंट'चे उद्घाटन गुरुवारी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. लाकडांवर वारली पेंटिंग काढल्यामुळे सेल्फी पॉईंट परिसर अत्यंत सुंदर बनले आहे. कुलगुरूंनी या ठिकाणी भेट दिल्यानंतर त्यांनाही सेल्फीचा मोह आवरला नाही.
या सेल्फी पॉइंटमुळे विद्यापीठ कॅम्पसच्या सौंदर्यात आणखीन भर पडल्याची भावना कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी प्र-कलगुरू डॉ. राजेश गादेवार, कुलसचिव योगिनी घारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपुर, विद्यापीठ अभियंता गिरीश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.