पंढरपूरजवळ दुचाकीच्या धडकेत दिंडीत चालणारा वारकरी जखमी
By विलास जळकोटकर | Updated: June 26, 2023 20:09 IST2023-06-26T20:08:55+5:302023-06-26T20:09:11+5:30
सोलापूर : पंढरपूरकडे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी दिंडीमध्ये पायी चालत असताना अज्ञात दुचाकीस्वाराने चालणाऱ्या वारकऱ्याला धडक देऊन जखमी केले. यात ...

पंढरपूरजवळ दुचाकीच्या धडकेत दिंडीत चालणारा वारकरी जखमी
सोलापूर : पंढरपूरकडे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी दिंडीमध्ये पायी चालत असताना अज्ञात दुचाकीस्वाराने चालणाऱ्या वारकऱ्याला धडक देऊन जखमी केले. यात डोक्याला व पायाला खचरटल्याने जखम झाली. रविवारी दुपारी ही घटना घडली. भास्कर गुलाबराव मरकट (वय- ६० रा. गोंदी, ता. आंबट, जि. जालना) असे जखमीचे नाव आहे. यातील जखमी भास्कर मरकट हे पांडुरंगाच्या दर्शनासाठी दिंडीतून पायी चालत निघाले होते. रविवारी दुपारच्यावेळी त्यांची दिंडी पंढरपूरपासून काही अंतरावर आली होती. एक दुचाकीस्वार आला आणि त्याने जोराची धडक मरकट यांना दिल्याने ते खाली पडले. त्यांच्या डोक्याला मार लागला. डाव्या हाताला खरचटले. तातडीने पंढरपूरच्या सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचार करुन सोलापूरला शासकीय रुग्णालयात बेशुद्धावस्थेत हलवण्यात आले. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.