दागिने पॉलिश करायचेत? मग ठेवा कुकरमध्ये! आजीबाईला ४ लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 08:25 IST2023-04-14T08:25:39+5:302023-04-14T08:25:54+5:30

पॉलिश करून देतो, असे सांगत वृद्धेला त्यांचे दागिने हळद आणि पाणी टाकून कुकरमध्ये ठेवण्यास सांगत ते सोने हातचालाखीने काढून घेतले

Want to polish jewelry Then put it in the cooker Grand mother got 4 lakhs | दागिने पॉलिश करायचेत? मग ठेवा कुकरमध्ये! आजीबाईला ४ लाखांचा गंडा

दागिने पॉलिश करायचेत? मग ठेवा कुकरमध्ये! आजीबाईला ४ लाखांचा गंडा

सोलापूर :

पॉलिश करून देतो, असे सांगत वृद्धेला त्यांचे दागिने हळद आणि पाणी टाकून कुकरमध्ये ठेवण्यास सांगत ते सोने हातचालाखीने काढून घेतले अन् चार लाखांचा गंडा घातला. 

सुनंदा भगवान कदम (वय ७०, रा. कुमार चौक, फॉरेस्ट) यांनी सदर बाझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कदम आजीबाई या घरी असताना बुधवारी दुपारी दोन अज्ञात तरुण आले. त्यांनी घरातील ताम्हण, चांदीची देवीची मूर्ती पॉलिश करून देत विश्वास संपादन केला. त्यानंतर सोन्याचे दागिने स्वच्छ करून देतो, असे सांगत त्यांच्या हातातील दोन बांगड्या, गळ्यातील लॉकेट व मण्याची माळ घेतली. तसेच त्या दागिन्यांना लाल रंगाची पावडर लावून ते कुकरमध्ये हळद आणि पाणी टाकून गरम करण्यास ठेवले. त्यानंतर हातचलाखीने दागिने काढून पोबारा केला.

Web Title: Want to polish jewelry Then put it in the cooker Grand mother got 4 lakhs