दागिने पॉलिश करायचेत? मग ठेवा कुकरमध्ये..हातचलाखी करून आजीबाईला ४ लाखांचा गंडा!

By रवींद्र देशमुख | Updated: April 13, 2023 16:56 IST2023-04-13T16:56:09+5:302023-04-13T16:56:33+5:30

रवींद्र देशमुख सोलापूर : दागिने पॉलिश करून देतो, असे सांगत वृद्ध महिलेला त्यांचे दागिने हळद आणि पाणी टाकून कुकरमध्ये ठेवण्यास ...

Want to polish jewelry? Then put it in the cooker. | दागिने पॉलिश करायचेत? मग ठेवा कुकरमध्ये..हातचलाखी करून आजीबाईला ४ लाखांचा गंडा!

दागिने पॉलिश करायचेत? मग ठेवा कुकरमध्ये..हातचलाखी करून आजीबाईला ४ लाखांचा गंडा!

रवींद्र देशमुख

सोलापूर : दागिने पॉलिश करून देतो, असे सांगत वृद्ध महिलेला त्यांचे दागिने हळद आणि पाणी टाकून कुकरमध्ये ठेवण्यास सांगितलं. त्यानंतर सोने हातचालाकीने काढून घेतले अन चार लाखांचे दागिने घेऊन आरोपी पसार झाल्याची घटना घडली आहे.

सुनंदा भगवान कदम ( वय ७०) यांनी याबाबत सदर बाझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कदम आजबाई या घरी असताना बुधवारी दुपारी दोन अज्ञात तरूण त्यांच्याजवळ आले. त्यांनी तांब्या व चांदीचे भांडी आणि दागिने स्वच्छ करून देतो असे सांगितले. त्यानंतर फिर्यादीने आरोपींना घरातील तांब्याचे तामण तसेच चांदीची देवीची मुर्ती पॉलिश करून विश्वास संपादन केला.

तसेच घरातील सोन्याचे दागिने स्वच्छ करून देतो, असे सांगत त्यांच्या सोन्याचे हातातील दोन बांगड्या, गळ्यातील लॉकेट व मण्याची माळ घेतली. तसेच त्या दागिन्यांना लाल रंगाची पावडर लावून ते कुकरमध्ये हळद आणि पाणी टाकून गरम करण्यास सांगितले. तसेच सोन्याचे दागिने हातचलाखीने घेवून त्यांची फसवणूक केली. आजीबाईच्या फिर्यादीवरून दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Want to polish jewelry? Then put it in the cooker.

टॅग्स :Goldसोनं