चांदण्यात फिरताना... थोडंसं दुपारीही फिरू या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 01:24 PM2020-02-27T13:24:04+5:302020-02-27T13:24:30+5:30

वातावरणात बदल जाणवू लागला. उन्हाळ्याची चाहूल लागली

Walking in the moon ... Let's go for a little afternoon ... | चांदण्यात फिरताना... थोडंसं दुपारीही फिरू या...

चांदण्यात फिरताना... थोडंसं दुपारीही फिरू या...

googlenewsNext

वातावरणात बदल जाणवू लागला. उन्हाळ्याची चाहूल लागली. सतत गाडी, रिक्षांचा वापर व तोंड बांधून बाहेर पडणं. यामुळे आपण आजूबाजूला पाहत नाही. हाशऽहुशऽ ला सुरुवात झाली की चर्चा चालू असते. खरंतर सकाळी व संध्याकाळी वातावरण मस्त आल्हाददायक असते, असे समजले जाते. तीच वेळ फिरायची, भेटायची, मिटिंगची ठरवली जाते. जरी कुठे जायचे तर वाहनांचाच वापर केला जातो. सुनसान रस्ते असणारी ही दहानंतरची दुपार असते.आता तुम्ही म्हणाल हो, हे काय नवीन आहे का? खरंच काही तरी सांगत आहेत. नवीन काहीच नाही, पण दृष्टी बदलली की सगळं नवीनच! अनोखं , निसर्ग सौंदर्य!! निसर्गाची रंगपंचमी.. पाहूया दुपारची..
ठरलेल्या ऋतुचक्राप्रमाणे हिवाळा संपला (थंडीची चाहूलही न देता, वातावरण बदल) तरीही पानगळ सुरू झाली. सोडून आर्तमन पिवळी पर्णे गळून नवजीवन देत तरुस जगणं शिकवत आहेत.कितीदा नव्याने? म्हणत...नवजीवन,नवतारुण्य, नवचैतन्य घेत-देत ही सजीवसृष्टी, हा सभोवतालचा आसमंत बहरत हरित रंगीत होत आहे.

रंग बदलती दुनिया में ?...बदलते रंगाचे अंकुरणे,पानांचे ते रंग बदलणे, पानापानांत दडलेली बालकळी , कुठे लाजत पाकळी उमलणारी फुले, विविधरंगी विविधता दाखवणारी अनेक झाडे, फुले चालत जाताना ही बहार आपणास दिसते. रस्त्यावर ,रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागेत, मोकळ्या रानात आपलं खुललेलं रुप खुदकन हसून दाखवत आहेत.सर्व जीवाला वेड लावते ते वेडभ्रमऱ फुलपाखरू यांना मोहीम करून स्पर्शण्यास आकर्षित करत आहेत?.

वाटेवरचा चालता चालता हा अनुभव घेत असताना मजेत इकडे तिकडे बघत असताना खट्याळ वारा गोलाकार घोंगावत फिरत वाटेवरचा धूळफेकीचा लाडिक चाळा करत सरसर पुढे जात उडता ओढणीचा पदर धरत कपाळावर आलेली बट मागे सारत डोळे मिटून पुन्हा चोळत उघडत इकडे तिकडे पाहत मन हरवून हा निसर्ग सोहळा आसमंताला पाहत पाऊल चालत राहतो.

सहभागी कुंड्यातील झाडे, बागेतील, गच्चीवरील झाडे कुंपणाच्या वर मान काढून डोकावून आपलं सौंदर्य दाखवण्याचा अवखळ प्रयत्न करीत आहेत.त्यांचे डोकावून पाहणे वाटसरु जाणून घेत हलकेच हात लावून काढत आहेत.,व्वा.. किती सुंदर कौतुक करून जात आहेत. निसर्गप्रेमी एखाद्या धाडसाने मला ह्याचे बी, रोपं देता का विचारत आहेत, विनवणी करत आहेत.

रंगांची उधळण, एक ना अनेक फुलांची सजावट एक ना अनेक रंग.. लाल, पिवळा, गुलाबी, केशरी, निळा जांभळा, फिक्कट गुलाबी, फिक्कट निळा विविध रंगांच्या छटा मनमोहित करण्यासाठी सज्ज झाल्या. पळस, बोगनवेल, गौरीशौरी, पिवळा बेल, एक्झोरा, कन्हेरी, गुलबक्ष, कोरंटी, चांदनी, स्वस्तिक, गुलाब, चिनीगुलाब, आॅफिसटाईम, जास्वंद, अबोली, अडेनियमची नवलाई, मधूमालती, कुंदा, चमेली, कुठेतरी जाई, झेंडू पिवळा केशरी, प्रत्येक ठिकाणी रानीवनी रानफुले रानवेली, गारवेली, धोतरा अशी अनंत फुलांची रंगावली त्यात कॅक्टसची ही सुंदरता भर घाली?. अशी ही निसर्ग जैवविविधतेची मांदियाळी मनतन सुगंधित करी?.

 कोकिळाची मध्येच गाणी, सोहळ्याला उपस्थित असणारे विहंग, पाखरे, फुलपाखरे भिरभिरती. असे विहंगम दृश्य अनुभवायला येते जेव्हा करता पैदल सफारी. तसेच अशा सकाळी दहानंतरच्या उन्हात डी जीवनसत्वाची कमतरताही भरुन निघेल.असा हा दुपारी चालण्याचा आनंद घेत एक रोप लावूया अंगणी कसा विचार येईल मनी.आरोग्यही लाभेल जिवनी. हे सगळं पाहत निवांत चालताना मनात विचार आणून या उन्हाळ्यात झाडाला पाणी घालूया. एक तरी झाड वाचवू या.

पशुपक्ष्यांना पाणी ठेवूया. निसर्ग संवर्धनला हातभार लावूया. चला तर मग आठवड्यातून दुपारी एक फेरफटका मारुया. सभोवताली निरखून पाहू या.
- विद्या भोसले
(लेखिका निसर्ग माझा चळवळीच्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत.)

Web Title: Walking in the moon ... Let's go for a little afternoon ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.