सोलापूर जिल्ह्यातील ह्यजलयुक्तह्णला पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 02:27 PM2019-07-29T14:27:18+5:302019-07-29T14:30:03+5:30

९३३ गावांमध्ये राबवली योजना : लोकसहभागातून वाढली जलसंधारणाची चळवळ

Waiting for the rain in Hijaluktahan in Solapur district | सोलापूर जिल्ह्यातील ह्यजलयुक्तह्णला पावसाची प्रतीक्षा

सोलापूर जिल्ह्यातील ह्यजलयुक्तह्णला पावसाची प्रतीक्षा

Next
ठळक मुद्दे गेल्या तीन वर्षांत सोलापूर जिल्ह्यात जलयुक्त शिवारची कामे मोठ्या प्रमाणावर झालीगतवर्षीप्रमाणे यंदाही या कामांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहेजलयुक्त शिवारमधून पाणी अडविण्यासाठी जिल्ह्यात ४ लाख ६७ हजार ३४९ हेक्टरवर कामे झाली

राजकुमार सारोळे

सोलापूर : गेल्या तीन वर्षांत सोलापूर जिल्ह्यात जलयुक्त शिवारची कामे मोठ्या प्रमाणावर झाली. गतवर्षीप्रमाणे यंदाही या कामांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. जलयुक्त शिवारमधूनपाणी अडविण्यासाठी जिल्ह्यात ४ लाख ६७ हजार ३४९ हेक्टरवर कामे झाली आहेत. यातून २ लाख २0 हजार ९0७ टीसीएम पाणी साठविण्याची क्षमता निर्माण झाली आहे. लोकसहभागातून गाळ काढण्याची १३५९ इतकी कामे झाली आहेत.

जलयुक्त शिवार कामे 
जलयुक्त शिवार अभियानात जलसंधारणाच्या माध्यमातून विभागात पाणलोटची कामे, सिमेंट साखळी नाला बांधकामे, जुने अस्तित्वातील सिमेंट नालाबांध/ के.टी. वेअर दुरुस्ती व नूतनीकरण, जलस्रोत्रातील गाळ काढणे, जलस्रोत्र बळकटीकरण, विहीर पुनर्भरण, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर आणि ओढे / नाले जोड कामे हाती घेण्यात आली. 

मळेगाव, वडाळा आदर्श 
या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये बार्शी तालुक्यातील मळेगाव, उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा आणि सांगोला तालुक्यातील महुद या गावात जलयुक्त शिवाराचे काम आदर्शवत झाले. या गावांमध्ये जलयुक्तमधील पाणी अडविण्याची सर्व कामे पूर्ण करण्यात आली. दुष्काळाचा सामना करणाºया या गावांना पाणीटंचाईने घेरले होते. पण थोड्या पडणाºया पावसाचे पाणी अडविल्याने भूजल पातळीत वाढ दिसून आली आहे. 

सोलापूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत जलयुक्त शिमळेगाव, वडाळा आदर्श वार योजनेची कामे मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. पहिल्यावर्षी झालेल्या पावसाने चांगला फायदा दिसून आला. पाण्याची पातळी वाढली होती. पण गतवर्षी व चालूवर्षी पाऊस कमी  आहे. 

- रवींद्र माने, 
कृषी उपसंचालक

दुष्काळावर मात करण्यासाठी उत्तर सोलापूर तालुक्यात जलयुक्त शिवारच्या कामावर भर दिला. पण पाऊस कमी असल्याने फरक दिसला नाही. पण कामे मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. जिथे पाऊस पडला तेथे चांगला फरक दिसत आहे. 
- बळीराम साठे, 
विरोधी पक्षनेते, झेडपी.

Web Title: Waiting for the rain in Hijaluktahan in Solapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.