शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

दुष्काळमुक्तीसाठी वडाळा ग्रामस्थांनी श्रमदानातून उभारले पाच वनराई बंधारे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 1:02 PM

दुष्काळमुक्तीसाठी वडाळा ग्रामपंचायतीचे एक पाऊल पुढे

ठळक मुद्देउत्तर सोलापूर हा कायमच दुष्काळी तालुका अनेक गावांना पिण्याच्या पाणीटंचाईला तोंड द्यावे लागतेजलसंवर्धनामध्ये गावाने ठसा उमटवण्याचा प्रयत्न चालवला

दत्तात्रय शिंदेवडाळा: एकीचे बळ आणि श्रमदानानं काय होऊ शकतं याचा आदर्श वडाळा ग्रामपंचायतीने समोर ठेवलाय. दुष्काळमुक्तीसाठी इथल्या ग्रामस्थांनी एक पाऊल टाकत चक्क पाच वनराई बंधारे उभारले आहेत. 

वडाळा ग्रामपंचायतीने पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जलयुक्त शिवार, शोषखड्डेयुक्त व गटारमुक्त गाव यांसह अनेक पुरस्कार पटकावत तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे. पाणीटंचाईच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करत असलेल्या वडाळा ग्रामपंचायतीने व ग्रामस्थांनी पाच वनराई बंधाºयांची उभारणी केलीय. माळरानावरून वाहणाºया या ओढ्यावर सिमेंटच्या रिकाम्या पिशवीत माती भरून वनराई पद्धतीचे पाच बंधारे बांधले. २० ते ३० फूट उंचीचे व ५० ते १०० फूट रुंदीचे हे बंधारे बांधण्यात आले आहेत. 

पावसाळा संपत आला तरी परतीचा पाऊस पडेल, या प्रतीक्षेत इथला शेतकरी आहे. या परिसरात कमी प्रमाणात पाऊस पडला असला तरी ते मिळणारे पाणी अडवले पाहिजे. ते पाणी वाहून जाण्यापेक्षा बंधारा बांधून साठवण्याचा निर्धार वडाळ्याचा ग्रामस्थांनी केला आणि तो पूर्णत्वासही आणला आहे. 

पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून वडाळा गावामध्ये जलसंवर्धनाची चळवळ चांगल्या प्रकारे रुजू झाली आहे. ग्रामस्थ व बळीरामकाका साठे यांच्या सहभागातून हा उपक्रम चालू आहे. याचा गावाला नक्कीच फायदा होणार असून, चालू दुष्काळजन्य परिस्थितीतही वडाळा गावातील सध्या पाण्याची पातळी बºयापैकी आहे. 

वनराई पद्धतीच्या बंधाºयामुळे पाण्याचे संवर्धन होणार असून, या भागातील शेतकºयांना त्याचा नक्की लाभ होणार आहे. गाव एका वेगळ्या विकासाच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा एक आदर्श गाव म्हणून राष्ट्रीय पातळीवर नावलौकिकास येत आहे. या उपक्रमात गावचे सरपंच रूपाली गाडे, उपसरपंच जितेंद्र साठे, ग्रामविकास अधिकारी अनिल शिंदे, ग्रा.पं. सदस्य मनोज साठे यांच्यासह ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वडाळा गाव पाणीयुक्त करण्यासाठी वाटचाल सुरू केली आहे.

ग्रामस्थांची साथ अन् ग्रामपंचायतीचे प्रयत्न- उत्तर सोलापूर हा कायमच दुष्काळी तालुका आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. त्यादृष्टीने वडाळा ग्रा.पं.च्या वतीने जलसंवर्धनाचे काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ म्हणून गावची पाण्याची पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या उपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त साथ दिल्यामुळे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाºयांना हुरूप आला आहे. जलसंवर्धनामध्ये गावाने ठसा उमटवण्याचा प्रयत्न चालवला असल्याचे जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्टÑवादीचे कार्याध्यक्ष बळीराम साठे यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणी