मतदारांनो..., हुकूमशाही वृत्तीच्या भाजप सरकारला जागा दाखवून द्या : सुशीलकुमार शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 02:39 PM2019-02-23T14:39:57+5:302019-02-23T14:41:45+5:30

सोलापूर : देशातील व राज्यातील भाजप सरकार केवळ घोषणाबाजीत आघाडीवर आहे़ या सरकारची कृती शून्य आहे़ त्यामुळे आगामी निवडणुकीत ...

Voters ..., show the seats to the dictatorial BJP government: Sushilkumar Shinde | मतदारांनो..., हुकूमशाही वृत्तीच्या भाजप सरकारला जागा दाखवून द्या : सुशीलकुमार शिंदे

मतदारांनो..., हुकूमशाही वृत्तीच्या भाजप सरकारला जागा दाखवून द्या : सुशीलकुमार शिंदे

Next
ठळक मुद्देगेल्या चार वर्षांत ना शेतकरी, ना व्यापारी, ना तरुण बेरोजगार सुखी - सुशीलकुमार शिंदेहुकूमशाही वृत्तीच्या सरकारला जागा दाखवून दिली पाहिजे - सुशीलकुमार शिंदेदुष्काळी परिस्थितीत सरकारने गांभीर्य ओळखून चारा आणि पाण्याची सोय करून द्यावी - सुशीलकुमार शिंदे

सोलापूर : देशातील व राज्यातील भाजप सरकार केवळ घोषणाबाजीत आघाडीवर आहे़ या सरकारची कृती शून्य आहे़ त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी. गेल्या चार वर्षांत ना शेतकरी, ना व्यापारी, ना तरुण बेरोजगार सुखी. त्यामुळे हुकूमशाही वृत्तीच्या सरकारला जागा दाखवून दिली पाहिजे असे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी उपस्थित मतदारांना केले.

सहकार शिरोमणी वसंतराव काळे यांच्या अमृतमहोत्सवी जयंतीनिमित्त वाडीकुरोली येथे आयोजित पुरस्कार वितरण व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर आ़ भारत भालके, संयोजक सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, नीलम राणे, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे चेअरमन सतीश सावंत, राजूबापू पाटील, माजी आ़ शहाजीबापू पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, पंढरपूर तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, मकाई कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल, स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगदीश बाबर, नगरसेवक चेतन नरोटे, संतोष पाटील, प्रतिभादेवी पतसंस्थेचे उपाध्यक्ष शहाजी साळुंखे, विठ्ठलचे संचालक महादेव देठे, कॉँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष नागेश फाटे, नारायण मोरे, सुरेश देठे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, कालपरवापर्यंत एकमेकांवर टीका कारणारे सेना-भाजपा आज गळ्यात गळा घालून युती करून निवडणुका लढविणार आहेत़ मात्र त्यांची खेळी जनतेच्या लक्षात आली आहे़ दुष्काळी परिस्थितीत सरकारने गांभीर्य ओळखून चारा आणि पाण्याची सोय करून द्यावी असेही शिंदे यांनी सांगितले़ यावेळी आ़ भारत भालके यांनी मनोगतातून सरकारच्या धोरणावर टीका केली़

Web Title: Voters ..., show the seats to the dictatorial BJP government: Sushilkumar Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.