पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 16:33 IST2020-04-12T16:31:47+5:302020-04-12T16:33:43+5:30

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचा निर्णय; कोरोनाच्या धर्तीवर गर्दी टाळण्यासाठी घेतला निर्णय

Vitthal-Rukmini's visit to Pandharpur will be closed till April 7 | पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार 

पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार 

ठळक मुद्देसणवार, उत्सव परंपरेनुसार साध्या पध्दतीने साजरे करण्याचा निर्णय श्रीचे नित्योपचार अत्यंत काटेकोरपणे, वेळच्या वेळी, प्रथा व परंपरांची सांगड घालून करणे आवष्यक

पंढरपूर :  कोरोना व्हायरस (कोविड-19) चा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढला आहे. खबरदारीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याने, भाविकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने विठ्ठल रूक्मिणी मंदिर दर्शनासाठी दि. ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती मंदिर समितीकडून प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आली. 

कोरोना व्हायरसमुळे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर दि. १७ मार्चपासून भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आलेले आहे. तथापि, कोरोना व्हायरस चा वाढता प्रभाव लक्षात घेता, राज्य शासनाने दि. ३० एप्रिलपर्यंत राज्यभर लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यानुसार मंदिरे समितीने विठ्ठल दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 


श्रीचे नित्योपचार अत्यंत काटेकोरपणे, वेळच्या वेळी, प्रथा व परंपरांची सांगड घालून करणे आवष्यक आहे. कामातील त्रुटींमुळे भाविकांच्या श्रध्देला तडा जाणार नाही यासाठी पुरेपर दक्षता घेणे आवश्यक आहे. तसेच वारकरी सांप्रदयाचे श्रींच्या नित्योपचारांबरोबर अन्य प्रथा परंपंरा यावर कटाक्षाने लक्ष्य असते ही बाब विचारात घेता, पहाटे होणारी श्रीची काकडा आरती, नित्यपुजा, महानैवेद्य, पोषाख, धुपारती व षेजारती इथेपर्यंतचे सर्व उपचार तसेच सध्या सुरू असलेली चंदनउटी पुजा सुरू आहे. त्याच्या स्वरूपात किंवा तिच्या पध्दतीत कोणत्याही प्रकारचे खंड न पाडता किंवा व्यत्यय न आणता मंदिरात दैनंदिन पूजोपचार चालू ठेवण्यात येत आहेत. तसेच इतर सणवार, उत्सव परंपरेनुसार साध्या पध्दतीने साजरे करण्याचा निर्णय सर्व सदस्य यांच्याशी विचारविनियम करून एकमताने घेतला असल्याचे सह अध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले. 

Web Title: Vitthal-Rukmini's visit to Pandharpur will be closed till April 7