२ टन फुलांनी सजविलं विठ्ठल-रुक्मिणी मंदिर; महाराष्ट्र दिनी पुण्याच्या विठ्ठल भक्तांची सेवा
By आप्पासाहेब पाटील | Updated: May 1, 2025 09:43 IST2025-05-01T09:42:53+5:302025-05-01T09:43:24+5:30
वर्षभर विविध संस्था व दिनाचे औचित्य साधून मंदिर समितीचे वतीने मंदिरात सजावट करण्यात येते.

२ टन फुलांनी सजविलं विठ्ठल-रुक्मिणी मंदिर; महाराष्ट्र दिनी पुण्याच्या विठ्ठल भक्तांची सेवा
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६६ व्या वर्धापन दिनानिमित्ताने आज गुरुवारी पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व गाभाऱ्यात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. पुण्याचे विठ्ठल भक्ताने दोन टन फुलांची आरास केल्याची माहिती मंदिर समितीच्या वतीने देण्यात आली.
या सजावटीमुळे श्रींचा गाभारा मनमोहक व आकर्षक दिसत आहे. सुट्टीचा दिवस असल्याने आज पहाटेपासूनच विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. पुण्याच्या भक्ताने सजावटीसाठी ब्लू डीजी गड्डी , स्टेटस गड्डी, कामिनी, जिप्सो, ऑर्किड, जरवेरा, दस गुलाब, झेंडू भगवा, झेंडू पिवळा आदी विविध अशा दोन टन फुलाचा वापर करण्यात आला आहे. ही सजावट पुणे विठ्ठल भक्त चव्हाण परिवाराच्या वतीने केली आहे. वर्षभर विविध संस्था व दिनाचे औचित्य साधून मंदिर समितीचे वतीने मंदिरात सजावट करण्यात येते. महाराष्ट्र दिनी करण्यात आलेली सजावट हजारो भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे.