Vitthal pays GST of Rs 8.50 crore; All the bank accounts of the factories were also started | 'विठ्ठल' ने जीएसटी चे ८.५० कोटी भरले; कारखान्यांचे सर्व बँक खातेही झाले सुरू 

'विठ्ठल' ने जीएसटी चे ८.५० कोटी भरले; कारखान्यांचे सर्व बँक खातेही झाले सुरू 

पंढरपूर : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने जीएसटी थकविल्याप्रकरणी जीएसटी कार्यालयाकडून सर्व खाती सील करण्यात आली होती. मात्र कारखाना प्रशासनाने ८ कोटी ५० लाख रुपय भारताच सर्व बॅक खाती शुक्रवारी सुरु करण्याचे लेखी आदेश जी एस टी आयुक्तांनी काढले असल्याची माहिती कारखाण्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांनी दिली.

कारखान्याच्या सभासदांमध्ये काही मंडळी गैरसमज पसरवित आहेत. याचबरोबर सोशल मिडीयावर अफवा पसरवण्यात येत असून  विठ्ठलच्या सभासदांची सर्व ऊस बिले देण्यास कारखाना प्रशासन सक्षम आहे. लवकरच ऊस बिले वाटप सुरु करण्यात येणार असल्याचे भगीरथ भालके म्हणाले.

सन २०१९ - २०२० गाळप हंगामामध्ये कारखाना सुरु झाला नाही. यामुळे सन २०१८ - २०१९ ची जीएसटीची रक्कम‌ थकबाकी राहिली होती. यावर्षीचा गाळप हंगाम सुरु करताना कै आ. भारत नाना भालके व संचालक मंडळानी वेळोवेळी पुणे येथील जीएसटी कार्यालयात जावून ५ कोटी ८२ लाख भरले आहेत. उर्वरीत रक्कम भरणेसाठी‌ मुदत घेतली होती. यावर्षी गाळप हंगामातील सर्व जीएसटी रक्कम कारखान्याने भरली असुन मागील थकीत रक्कमेपैकी ८ कोटी ५० लाख भरले आहेत. चेअरमन भगिरथ भालके व संचालक मंडळाने जीएसटी सह आयुक्त यांची भेट घेवुन थकित रक्कमेबाबतची तपशिलवार माहिती दिली. यामुळे शुक्रवारी सील‌ केलेली सर्व बॅक खाती सुरु करण्यात आली आहेत. कै भारत नाना भालके यांच्या धोरणानुसार कारखान्याचे कामकाज संचालक मंडळ करीत आहे. मागील कोणतीही ऊसबिले थकीत नाहीत. यावर्षीच्या गाळप हंगामातील एफआरपी प्रमाणे ऊस बिलांचे लवकरच वाटप सुरु करणार असल्याचे चेअरमन भगिरथ भालके यांनी सांगितले.

कारखान्याची सर्व खाती सील करण्यात आली होती. शिवाय साखर आयुक्तांनी आर आर सी ची कारवाई करत मालमत्ता विकुम शेतकऱ्यांची देणी देण्यात यावीत आसा आदेश काढला होता. त्यामुळे उस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती. मात्र कारखाना प्रशासनाने वेगवान हालचाली करत बंध झालेली खाती सुरू करण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे कामगार, ट्रॅकटर मालक, शेतकऱ्यांना त्यांची ऊस बिले मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Web Title: Vitthal pays GST of Rs 8.50 crore; All the bank accounts of the factories were also started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.