हुलजंती यात्रेदरम्यान जमावबंदी आदेशाचा भंग; ७४ भाविकाांविरूध्द गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2020 08:58 AM2020-11-16T08:58:37+5:302020-11-16T08:59:05+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Violation of curfew during Huljanti Yatra; Crimes filed against 74 devotees | हुलजंती यात्रेदरम्यान जमावबंदी आदेशाचा भंग; ७४ भाविकाांविरूध्द गुन्हा दाखल

हुलजंती यात्रेदरम्यान जमावबंदी आदेशाचा भंग; ७४ भाविकाांविरूध्द गुन्हा दाखल

Next

मंगळवेढा : हुलजंती येथील महालिंराया यात्रेदरम्यान सोलापूर जिल्ह्यामध्ये जमावबंदी आदेश असतानाही एकत्र येवून गर्दी करून तोंडाला मास्क न लावता, सोशल डिस्टिंसिंगचे पालन न करता शासनाच्या नियमाचा भंग केल्याप्रकरणी सुमारे ७४ लोकांविरूद्ध मंगळवेढा पोलिसात रात्री उशीरा गुन्हे दाखल करण्यात आले.
या घटनेची हकीकत अशी की, दि.१५ रोजी दुपारी ३ वाजता हुलजंती येथील महालिंगराया यात्रा असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हयात जमावबंदी आदेश पारित करून १४४ कलम लागू केले होते. महालिंगरायांच्या मंदिराजवळ अमोगसिद्ध तम्मण्णा पुजारी, शरणप्पा आण्णाप्पा पुजारी, काशीराम शिलवंत पुजारी, शरणप्पा आर. पुजारी आदी बिरोबा देवाच्या पालखीसोबत तर तुकाराम शाम वडीयार,काशीनाथ श्रीमंत वडीयार,बिराप्पा व्यंकटप्पा वडीयार (सर्वजण रा.शिरढोण), भरोबा मासाळे, गुडाप्पा मासाळे (उमरगा), देवस्थान ट्रस्टचे यलगोंडा पटाप, बाळासाहेब जकराया पेटरगी, म्हाळाप्पा तुकाराम पुजारी,यशवंत रामगोेंडा पाटील, रायाप्पा धोंडाप्पा काटे (सर्व रा.हुलजंती) या १४ लोकांसह इतर ५० ते ६० लोकांनी एकत्र येवून तोंडाला मास्क न लावता, सोशल डिस्टिंसिंगचे पालन न करता, सॅनिटायझरचा वापर न करता शासनाच्या नियमाचा भंग केला असल्याचे पो.ना.राजकुमार ढोबळे यांनी फिर्यादीत म्हंटले आहे.


दरम्यान, गर्दीस पोलिसांनी पांगवण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीसांनाही  न जुमानता तशीच गर्दी करून शासनाच्या नियमाचा भंग केला आहे म्हणून वरील सर्वाविरूद्ध साथीचे रोग प्रतिबंधक व महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Violation of curfew during Huljanti Yatra; Crimes filed against 74 devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.