Villagers save five-day-old Padsa due to police vigilance | ग्रामस्थ, पोलिसांच्या सतर्कतेमुळे पाच दिवसाच्या पाडसाला जीवदान

ग्रामस्थ, पोलिसांच्या सतर्कतेमुळे पाच दिवसाच्या पाडसाला जीवदान

माढा येथील प्रतिभा कुंदन शिरसट व कुटुंबातील लोक शेतामध्ये काम करीत असताना हरणाच्या पाडसावर भटक्या श्वानांकडून हल्ला होत असल्याचे दिसले. लगेच श्वानांना हिसकावून लावत पोलिसांना या घटनेची माहीती दिली. लागलीच पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे, पोलीस लक्ष्मण तागडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल महम्मद शेख, आझर शेख, बालाजी घोरपडे, पोलीस नाईक विशाल पोरे, चंद्रकांत गोरे यांचे पथक तात्काळ घटनास्थळी गेले. तेव्हा जखमी हरणाच्या पाडसाला ताब्यात घेतले. नंतर माढा पोलीस ठाण्यामध्ये आणून वन कर्मचारी तानाजी दळवी व अशोक यादव यांच्याकडे सुपूर्द केले.

फोटो

१०माढा०१

ओळी

माढा पोलीस ठाण्यात वन कर्मचारी तानाजी दळवी व अशोक यादव यांना जखमी हरणाचे पाडस देताना पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे, आझर शेख, लक्ष्मण तागडे, विशाल पोरे.

Web Title: Villagers save five-day-old Padsa due to police vigilance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.