शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

गांववालोऽऽ.. सुन लो.. जबतक पगार नै मिलेगा.. तबतक जुले शोलापूर टंकीसे नीचे नहीच आयेंगे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 1:57 PM

रात्रभर सुरु होते शोले स्टाईल आंदोलन; वेतनासाठी परिवहन कर्मचाºयांचा असाही संघर्ष; महापालिकेत तोडग्यासाठी बोलावलेली बैठक निष्फळ

ठळक मुद्देथकीत वेतन मिळावे यासाठी कामगारांनी २८ जूनपासून संप पुकारला, शहरातील सिटी बससेवा बंदजुळे सोलापुरातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली, टाकीवर तिरंगा फडकाविण्यात आलाकामगारांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि मनपा प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली

सोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाच्या कामगारांना १४ महिन्यांचे थकीत वेतन मिळावे यासाठी कामगार आणि प्रहार संघटनेच्या पदाधिकाºयांनी सोमवारी सकाळी जुळे सोलापुरातील उंचावरील टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले. सोमवारी रात्री कामगार या टाकीवर मुक्कामी होते. जोपर्यंत पगाराचा निर्णय होत नाही तोपर्यंत खाली येणार नाही. असा निर्धार कामगारांनी केला आहे.  दरम्यान, या कामगारांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मनपा पदाधिकारी आणि प्रशासनाने बैठक घेतली. त्यात तोडगा निघाला नाही. 

थकीत वेतन मिळावे यासाठी कामगारांनी २८ जूनपासून संप पुकारला आहे. शहरातील सिटी बससेवा बंद आहे. परिवहन उपक्रम आर्थिक अडचणीत आहे. मनपाकडून परिवहनला विशेष निधी दिला जातो. त्यातून कामगारांच्या पगारी होतात. मनपाचे अंदाजपत्रक ९ जुलै रोजी मंजूर होणार आहे. अंदाजपत्रकानंतर वेतनावर तोडगा काढू, असे मनपा आयुक्त दीपक तावरे यांनी सांगितले आहे. यादरम्यान, सोमवारी जुळे सोलापुरातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. टाकीवर तिरंगा फडकाविण्यात आला. कामगारांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि मनपा प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलकांनी खाली यावे यासाठी पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले, परंतु कामगार खाली येण्यास तयार नव्हते. 

जिल्हा संपर्कप्रमुख शंभूराजे खलाटे, जिल्हाप्रमुख दत्तात्रय मस्के-पाटील, प्रहार अपंग क्रांतीच्या जिल्हाध्यक्ष संजीवनी बारंगुळे, शहर संपर्कप्रमुख  जमीर शेख, शहरप्रमुख अजित कुलकर्णी, कार्याध्यक्ष खालिद मनियार, उपप्रमुख मुश्ताक शेदसंदी, सचिन वेणेगूरकर, परिवहन संघटनेचे देविदास गायकवाड, आर.एम. मकानदार, अनिल चौगुले, शाकीर उस्ताद, विजय गायकवाड, नागेश म्हेत्रे, शिवपुत्र अजनाळकर आदी उपस्थित होते. सोमवारी रात्री कामगार टाकीवरच बसून होते. काही कार्यकर्त्यांनी जेवण आणले. टाकीवरच बसून जेवण उरकण्यात आले. मंगळवारी आंदोलन कायम राहणार आहे.

पावसात भिजल्याने एकाची प्रकृती बिघडली- सकाळी १५० कामगार टाकीवर चढले. दुपारचे जेवण सर्वांनी मिळून केले. तहान लागल्याने काही लोकांनी पाण्याच्या टाकीत उतरुन पाणी आणले. त्यानंतर काही वेळाने एक पाण्याचा जार मागविण्यात आला. दुपारी पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी पावसाचा जोर वाढला. कामगार आणि प्रहारचे पदाधिकारी जागेवरुन हलले नाहीत. पावसात भिजल्याने वाहक दत्तात्रय बारड यांची प्रकृती बिघडली. त्यांना ताप येऊन चक्कर आली. पोलिसांनी त्यांना खाली उतरविले. खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी कामगार तिथेच बसून होते. थंडीने कुडकुडत होते. अनेकांना डासांचा त्रासही सहन करावा लागत होता. 

प्रशासनाचा तोडगा कामगारांना मान्य नाही - कामगारांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी महापौर कक्षात दुपारी १२ वाजता बैठक झाली. महापौर शोभा बनशेट्टी, मनपा आयुक्त दीपक तावरे, सभागृह नेते संजय कोळी, विरोधी पक्षनेते महेश कोठे, परिवहन समितीचे सभापती गणेश जाधव, अनंत जाधव, नगरसेवक अमर पुदाले, राजेश काळे, परिवहन सदस्य परशुराम भिसे, तिरुपती परकीपंडला आदी उपस्थित होते. यावेळी मनपा आयुक्तांनी एक महिन्यांचा पगार तत्काळ देण्याची आणि मनपाचे अंदाजपत्रक मंजूर झाल्यानंतर उर्वरित तीन महिन्यांच्या पगाराबाबत विचार करण्याची तयारी दर्शविली. पण कामगार चार महिन्यांच्या वेतनावर ठाम राहिले. त्यामुळे या बैठकीत तोडगा निघाला नाही. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाBus DriverबसचालकVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुखSubhash Deshmukhसुभाष देशमुख