शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी एकादशीनिमित्त चिंचपूरचे वीणेकरी करणार मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय पूजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 00:12 IST

चिठ्ठीव्दारे झाली निवड; विठ्ठलाची दर्शन रांग वारकºयांविनाच रिकामी

ठळक मुद्देविठ्ठल ज्ञानदेव बडे हे मागील ५ ते ६ वर्षांपासून मंदिरात वीणा वाजवून पहारा देत आहेतमागील ३ महिन्यांपासून लॉकडाऊन असताना देखील वीणा वाजवून पहारा देत आहेतलॉकडाऊन असताना देखील पूर्णवेळ ते मंदिरात सेवा करीत आहेत

पंढरपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये. विठ्ठल भक्तांना कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी आषाढी यात्रेनिमित्त भाविकांना पंढरपुरात येण्यास बंदी केली आहे. यामुळे विठ्ठलाची दर्शन रांग रिकामी आहे. दर्शन रांगेत भाविक नसल्याकारणाने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहारा देणाºया ६ वीणेकºयांपैकी चिठ्ठीद्वारे एकाची निवड मानाचा वारकरी म्हणून करण्यात आली आहे. या मानाच्या वारकºयाचे नाव विठ्ठल ज्ञानदेव बडे (वय ८४, रा. मु. पो. चिंचपूर- पांगूळ, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) असून त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शासकीय महापूजा करण्याची संधी मिळणार आहे.

आषाढी यात्रा कालावधी २२ जून ते ५ जुलै २०२० असा राहणार आहे. आषाढी यात्रा एकादशीनिमित्त असणारी विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते १ जुलै रोजी पहाटे २.२० वाजता होणार आहे. 

मुख्यमंत्र्यांबरोबर शासकीय महापूजेचा दर्शन रांगेतून निवडलेल्या भाविकाला मानाचा वारकरी म्हणून मान देण्यात येतो, परंतु यंदाच्या वर्षी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांना बंद आहे. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात २४ तास पहारा देणारे वीणेकरी यांची मानाचा वारकरी म्हणून निवड करण्यात आली आहे. यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर, सदस्य संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.

सहा वर्षांपासून मंदिरात वाजवतात वीणाविठ्ठल ज्ञानदेव बडे हे मागील ५ ते ६ वर्षांपासून मंदिरात वीणा वाजवून पहारा देत आहेत. ते स्वत: व त्यांचे कुटुंबीय देखील माळकरी आहेत. मागील ३ महिन्यांपासून लॉकडाऊन असताना देखील वीणा वाजवून पहारा देत आहेत.  लॉकडाऊन असताना देखील पूर्णवेळ ते मंदिरात सेवा करीत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Wariपंढरपूर वारीUddhav Thackerayउद्धव ठाकरेAshadhi Ekadashiआषाढी एकादशी