शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
2
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
3
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
4
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
5
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
6
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
7
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
8
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
9
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
10
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
11
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
12
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
13
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
14
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
15
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
16
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
17
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
18
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
19
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी
20
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!

व्हॅलेंटाईन डे स्पेशल : सोलापूरातील एचआयव्हीग्रस्तांच्या वधू-वर मेळाव्यात सहा एचआयव्हीग्रस्त विवाहेच्छुकांचे मनोमीलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 18:02 IST

कळत नकळत एचआयव्हीची शिकार झालेल्या अन् समाजाच्या प्रेमाला पारखे झालेल्या एचआयव्हीग्रस्त मुलांमुलींनी एकत्र येत एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत विवाहाच्या रेशीमबंधात सामावून घेण्याचा निर्णय घेत खºया अर्थाने व्हॉलेंटाईन डे साजरा केला

ठळक मुद्दे- सोलापूर शहरातील आगळावेगळा उपक्रम- एचआयव्ही बाधितांसाठी काम करणारी विहानही स्वयंसेवी संस्था व त्यांच्या जोडीने काम करणारी संकल्प फौंडेशनचा उपक्रम- शाब्दी सोशल गु्रपचे अध्यक्ष रसुल पठाण यांनी ५०० लोकांना दिले मोफत जेवण

 

बाळासाहेब बोचरेसोलापूर दि १४ : कळत नकळत एचआयव्हीची शिकार झालेल्या अन् समाजाच्या प्रेमाला पारखे झालेल्या एचआयव्हीग्रस्त मुलांमुलींनी एकत्र येत एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत विवाहाच्या रेशीमबंधात सामावून घेण्याचा निर्णय घेत खºया अर्थाने व्हॉलेंटाईन डे साजरा केला.  एचआयव्ही बाधित हीच आपली जात समजून  जात- धर्माच्या भेदाला छेद देत एकत्र आलेल्या या विवाहेच्छुकांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे अशा बाधितांच्या वधू-वर मेळाव्यात सहा जोड्यांच्या विवाहाची सुपारी फुटली गेली. एचआयव्ही बाधितांसाठी काम करणारी  ‘विहान’ही स्वयंसेवी संस्था व त्यांच्या जोडीने काम करणारी संकल्प फौंडेशन ही युवकांची फळी. यांनी मिळून यंदा व्हॅलेंटाईन डे आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा करण्याचा  निर्णय घेतला.  एचआयव्ही बाधित विवाहेच्छुकांना त्यांनी आवाहन करुन त्यांची माहिती संकलित केली आणि  त्यांचा मेळावा सोलापुरातील इम्पिरियल हॉलमध्ये भरवला.  मेळाव्यात सोलापूर जिल्ह्यासह पुणे, मुंबई, कोल्हापूर,लातून येथून ५९ पुरूष आणि  १८ मुलींनी हजेरी लावून आपला परिचय दिला आणि  परिचय देताना जात या विषयावर अनेकांनी बोलणे टाळले. एचआयव्ही बाधित हीच आपली जात  असे त्यांनी उजळमथ्याने सांगितले. आज जमलेल्या सहा जोड्यांपैकी  चार जोड्या या आंतरजातीय असून त्यापैकी  दोन हे बिजवर आहेत. दोन जोड्यांना त्यांच्या स्वत:च्या जातीचा जोडीदार मिळाले. प्रत्येक जोड्यांना एकत्र बसवून एकमेकांची सविस्तर माहिती देवनू चारचौघात लग्ने जमविण्यात आली. लवकरच या जोड्यांचा विवाह लावून देण्याची जबाबदारी संकल्प फौंडेशनने घेतली आहे. मेळाव्याला आमदार प्रणिती शिंदे, सोलापूर एआरटी सेंटरच्या प्रमुख डॉ. अग्रजा चिटणीस, जिल्हा एडस् नियंत्रण संस्थेचे प्रमुख भगवान भुसारी, अ‍ॅड. शीलाताई मोेरे, अ‍ॅड. मंगला चिंचोळकर, मुंबई प्रदेश कॉग्रेस मानवाधिकार सेलचे प्रमुख इस्तियाकबी जहागीरदार यांनी मार्गदर्शन केले. शाब्दी सोशल ग्रुपचे रसूल पठाण यांनी मोफत जेवण दिले. शौकत पठाण व नगरसेविका फिरदोस पटेल यांनी मोफत हॉल उपलब्ध करुन दिला. हा मेळावा पार पाडण्यासाठी विहानचे कार्यक्रम संचालक समाधान माळी,अ‍ॅड. बसवराज सलगर,अध्यक्षा राणी श्रीनिवास वल्लमदेशी, कार्यक्रम समन्वयक ब्रह्मदेव श्रीमंगले, संकल्प फौंडेशनचे किरण लोंढे,पूजा काटकर, श्रध्दा राऊळ, दत्ता गाकयवाड,नागनाथ दुपारगुडे यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी एचआयव्हीग्रस्त विवाहेच्छुकांचे मनोमीलन घडवून आणण्यात मोलाचे परिश्रम घेतले. 

टॅग्स :Solapurसोलापूर