शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

थीम पार्टीज्ने साजरा होणार व्हॅलेंटाईन डे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 10:45 AM

कॉलेजमध्ये मुला-मुलींमध्ये उत्साह; रोज डे, चॉकलेट डे साजरे झाले कट्ट्यावर, आता पार्टी हॉटेलात !

ठळक मुद्देसोलापुरातील महाविद्यालयांमध्ये सध्या व्हॅलेन्टाईन डेचा माहोलरोज डे, चॉकलेट डे, टेडी डेही साजरे करण्यात आलेकॉलेजच्या कट्ट्यांवर जमलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला

सोलापूर : सोलापुरातील महाविद्यालयांमध्ये सध्या व्हॅलेन्टाईन डेचा माहोल असून, युवक-युवती आपल्या मित्रांसोबत हा दिवस  नेमका कसा साजरा करायचा, याचे प्लॅनिंग करण्यात मग्न आहेत.   हे नियोजन करतानाच रोज डे, चॉकलेट डे, टेडी डेही साजरे करण्यात आले. कॉलेजच्या कट्ट्यांवर जमलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला असताना यंदाच्या ‘व्हॅलेंटाईन डे’ला थीम पार्टीज् आयोजित करण्याचे बहुतांश मुलांचे नियोजन असल्याचे समजले.

शहरातील प्रमुख महाविद्यालयांमध्ये मुला-मुलींमध्ये मोठा उत्साह दिसून आला. व्हॅलेंटाईन डेच्या सप्ताहातील रोज डे आणि चॉकलेट डे आम्ही मित्र-मैत्रिणींनी कॉलेजमध्येच साजरा केला; पण १४ फेब्रुवारीचा मुख्य दिवस एखाद्या हॉटेलमध्ये मोठे टेबल आरक्षित करून साजरा करणार आहोत,  असे मुलांनी सांगितले.

 व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी थीम पार्टीमध्ये नृत्य करण्यासाठी खास क्लास लावला आहे, असे नागेश पवार या विद्यार्थ्याने आपला प्लॅन उलगडून सांगितला.  याशिवाय कँडल लाईट डीनरचे आयोजन केले असल्याचे काही मुलांनी आवर्जून सांगितले.

दरम्यान, गिफ्ट्स आर्टिकल्सच्या दुकानातही सध्या गर्दी वाढली असून, याच ठिकाणी ग्रीटिंग कार्डस्ही उपलब्ध करून ठेवण्यात आल्यामुळे मुले आपल्याला आवडेल, असा संदेश असलेले कार्ड शोधण्यात गर्क होती. ताजमहालची प्रतिकृती,  राधा-कृष्णाची प्रतिमा, गॉगल्स, परफ्युम्स आदी गिफ्ट आर्टिकल्सना मागणी असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

या वर्षी हटके सेलिब्रेशन करण्यासाठी थीम पार्टी आम्ही आयोजित केली आहे़ यासाठी क्लास लावून डान्सची  प्रॅक्टिस केली आहे़ यामुळे यंदाचा व्हॅलेंटाईन डे खूप जल्लोषात आम्ही सर्व मित्र-मैत्रिणी साजरा करणार आहोत़ - नागेश पवार, तरुण 

आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येकाला एखादे तरी वचन देत असतो़ नाते टिकवण्यासाठी वचन देणे खूप महत्त्वाचे असते़ यासाठी हा दिवस साजरा केला जातो़ यामुळे एकमेकांवरील प्रेम टिकवून ठेवण्यासाठी हे गरजेचे आहे़ यामुळेच आम्ही या आठवड्यामधील हा दिवस तर नक्की साजरा करतो़ - स्नेहा लिंगशेट्टी, तरुणी 

सध्या तरुणाईमध्ये व्हॅलेंटाईन डेची मोठी क्रेझ आहे़ हा आठवडा म्हणजे आपल्या जिवलग व्यक्तीवर प्रेम व्यक्त करण्याचा दिवस़ ज्या व्यक्तीला प्रेमाची गरज आहे त्या व्यक्तीसोबत हा दिवस साजरा करा़ यामुळे त्यांनाही आपण समाजाचा एक घटक असल्याची जाणीव होईल आणि आपल्यालाही एक नवा मित्र मिळेल़- वर्षा कणसे, तरुणी

१४ फेब्रुवारी रोजी आपल्या प्रिय व्यक्तीला स्वत:चा वेळ देऊन पाहा,  भलेही ते कोणीही असो जोडीदार, मित्र, आई-वडील कोणीही, त्यावेळी त्यांच्या चेहºयावर आलेली खुशी तुमची व्हॅलेंटाईन  गिफ्ट बनेल.- मुग्धा चव्हाण, तरुणी

टॅग्स :SolapurसोलापूरValentine Dayव्हॅलेंटाईन्स डेLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट