Suresh Khade : वाजपेयी, अडवाणी पराभूत झाले मात्र मोदींचा पराभव अशक्य; कामगार मंत्री सुरेश खाडेंचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2022 14:04 IST2022-09-10T13:56:36+5:302022-09-10T14:04:32+5:30
Suresh Khade : "बारामतीत उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपा पूर्ण ताकतीने प्रयत्न करणार आहे."

Suresh Khade : वाजपेयी, अडवाणी पराभूत झाले मात्र मोदींचा पराभव अशक्य; कामगार मंत्री सुरेश खाडेंचा दावा
विठ्ठल खेळगी
सोलापूर - वाजपेयी, अडवाणी पराभूत झाले आहेत, मात्र नरेंद्र मोदी देशाचा आत्मा आहेत. ते पराभूत होऊच शकत नाहीत, असा दावा कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केला आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी सुरेश खाडे पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते पुढे म्हणाले, बारामतीत उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपा पूर्ण ताकतीने प्रयत्न करणार आहे. बारामतीत पवारांचा पराभव होणार का? असे विचारल्यावर ते म्हणाले, जनतेचा कौल असतो. तो प्रत्येक वेळी एक सारखाच येईल, असे कोणी समजू नये. गांधी, वाजपेयी, अडवाणी हेही पराभूत झाले आहेत. यामुळे जनतेचा कौल विचारात घ्यावा लागतो. त्याच बरोबर मोदी हे जागतिक दर्जाचे नेते असून ते देशाचा आणि जनतेचा आत्मा असल्याने त्यांचा पराभव अशक्य असल्याचे हेही खाडे यांनी सांगितले.