उत्पादनवाढीसाठी पाच न जाळता योग्य पाण्याचा वापर करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:19 AM2021-01-02T04:19:16+5:302021-01-02T04:19:16+5:30

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त मोहोळ तालुका मराठा सेवा संघाच्या वतीने एकरी १०० टन उत्पादन संकल्प कार्यक्रम अंतर्गत ऊस ...

Use proper water without burning five to increase production | उत्पादनवाढीसाठी पाच न जाळता योग्य पाण्याचा वापर करावा

उत्पादनवाढीसाठी पाच न जाळता योग्य पाण्याचा वापर करावा

Next

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त मोहोळ तालुका मराठा सेवा संघाच्या वतीने एकरी १०० टन उत्पादन संकल्प कार्यक्रम अंतर्गत ऊस पीक परिसंवाद आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी बागायतदार काशिनाथ राऊत होते. व्यासपीठावर प्रा. दिनेश क्षीरसागर, डॉ. सुरज मिसाळ, उपनगराध्यक्ष प्रमोद बापू डोके, ज्येष्ठ विधिज्ञ क्षीरसागर बापू, अरुण भोसले आदींची उपस्थिती होती.

प्रारंभी जिजाऊ, बळीराजा आणि डॉ पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजनानंतर दिल्लीतील मृत शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यासह कॅलेंडर २०२१ तसेच बळीराजा अंकाचे अनावरण करण्यात आले.

कार्यक्रमासाठी तालुकाध्यक्ष मनोजकुमार मोरे, आकाश फाटे, रणधीर देशमुख, धनराज फाटे, सज्जन सातपुते,विशाल देशमुख, सुरज धनवे, करण तगारे आदी पदाधिकऱ्यांनी परिश्रम घेतले.

---०१मोहोळ----

मोहोळ येथे आयोजित ऊस परिसंवादात बोलताना डॉ. शरद जाधव. सोबत काशिनाथ राऊत,प्रा. दिनेश क्षीरसागर, डॉ. सुरज मिसाळ, उपनगराध्यक्ष प्रमोद बापू डोके, ज्येष्ठ विधिज्ञ क्षीरसागर बापू, अरुण भोसले आदी.मोहोळ येथे आयोजित ऊस परिसंवादात बोलताना डॉ. शरद जाधव. सोबत काशिनाथ राऊत,प्रा. दिनेश क्षीरसागर, डॉ. सुरज मिसाळ, उपनगराध्यक्ष प्रमोद बापू डोके, ज्येष्ठ विधिज्ञ क्षीरसागर बापू, अरुण भोसले आदी.

Web Title: Use proper water without burning five to increase production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.