शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिका - इराण युद्ध; सोलापूरचे दहा पर्यटक अबुधाबी विमानतळावर अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 09:50 IST

सोलापुरातून दुबईला पर्यटनासाठी गेलेले दहा पर्यटक अबुधाबी आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर अडकून पडले आहेत.

सोलापूर : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. मध्यपूर्वेतही हल्ले होत असल्यामुळे तेथील हवाई वाहतूक पूर्णतः बंद केली आहे. त्यामुळे सोलापुरातून दुबईला पर्यटनासाठी गेलेले दहा पर्यटक अबुधाबी आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर अडकून पडले आहेत.

इराण-इराक या देशांमध्ये संभाव्य युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन सोलापूर जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांसाठी आवश्यक सूचना जारी करण्यात येत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांचे नातेवाईक अथवा परिचित इराण किंवा इराक येथे वास्तव्यास असल्यास त्यांच्या सुरक्षिततेबाबत किंवा इतर कोणत्याही बाबतीत माहिती आवश्यक असल्यास संबंधितांनी जिल्हा प्रशासनाने स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.

या संदर्भात मंत्रालय, मुंबई येथील आपत्कालीन संचालन केंद्राशी (EOC) संपर्क साधण्यात आलेला असून, कोणत्याही नागरिकाकडून इराण-इराक येथे वास्तव्यास असलेल्या व्यक्तींबाबत चौकशी प्राप्त झाल्यास मंत्रालय नियंत्रण कक्षामार्फत संबंधित भारतीय दूतावासाशी संपर्क साधून त्या व्यक्तींच्या सुरक्षिततेबाबत माहिती प्राप्त करून ती संबंधितांना कळविण्यात येईल.

सदर बाबीची नोंद घेऊन नागरिकांनी आवश्यकतेनुसार खालील नियंत्रण कक्षांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक :* जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर नियंत्रण कक्ष : 0217-2731012 * सोलापूर पोलीस शहर नियंत्रण कक्ष : 0217 - 2744600 / 2744620,• सोलापूर पोलिस ग्रामीण नियत्रंण कक्ष: 0217- 2732000* मंत्रालय नियंत्रण कक्ष, मुंबई : 9321590561

English
हिंदी सारांश
Web Title : Solapur Tourists Stranded in Abu Dhabi Amid US-Iran Tension

Web Summary : Following US-Iran tensions, ten Solapur tourists are stranded at Abu Dhabi airport due to disrupted air travel. Solapur administration issued safety guidelines and control room numbers for citizens with relatives in Iran or Iraq.
टॅग्स :SolapurसोलापूरDubaiदुबईAmericaअमेरिकाIsraelइस्रायलIranइराणwarयुद्ध