शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

उर्दू ही देशाची, महाराष्ट्राचीच भाषा, सुशीलकुमार शिंदे, राष्ट्रीय उर्दू ग्रंथ प्रदर्शनाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 11:38 AM

गझल, शायरीसह विविध प्रकारचे साहित्य असे उर्दूमध्ये आज उपलब्ध होत आहे़ अर्थात या शहरात उर्दूप्रेमी आणि अभ्यासकांची संख्या किती मोठी आहे हे सहज लक्षात येते़ युवा पिढीला प्रोत्साहन देणारे साहित्य या संमेलनात पाहायला मिळाले़ त्यामुळे ही भाषा भारताचीच आहे

ठळक मुद्देउर्दूसाठी केंद्र फार काही करत नाही : कमल सिंगलग्नाची नोंद शासन दरबारी ठेवण्याचा आग्रह शाहूंनी धरला होता : वसुधा पवार९ दिवसीय ग्रंथ प्रदर्शनात शेवटच्या दिवसापर्यंत ६० लाख १७ हजार २४० रुपयांच्या ग्रंथसंपदेची विक्री

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १  : गझल, शायरीसह विविध प्रकारचे साहित्य असे उर्दूमध्ये आज उपलब्ध होत आहे़ अर्थात या शहरात उर्दूप्रेमी आणि अभ्यासकांची संख्या किती मोठी आहे हे सहज लक्षात येते़ युवा पिढीला प्रोत्साहन देणारे साहित्य या संमेलनात पाहायला मिळाले़ त्यामुळे ही भाषा भारताचीच आहे आणि ती महाराष्ट्राची आहे़ या महाराष्ट्रातूनच औरंगाबाद, हैदराबाद आणि इतर शहरात ती पसरत गेल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले़ सोलापूर शहरात पानगल हायस्कूलच्या मैदानावर गेल्या नऊ दिवसांपासून चाललेल्या राष्ट्रीय ग्रंथ प्रदर्शनाचा समारोप रविवारी सायंकाळी सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत झाला़ याप्रसंगी ते बोलत होते़ यावेळी महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीचे संस्थापक तथा शाहू संस्थेचे संचालक जयसिंग पवार यांच्या पत्नी वसुधा पवार, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, अ़ भा़ उर्दू भाषा विकास परिषदेचे सहायक संचालक कमल सिंग, रिसर्च आॅफिसर शहानवाज खुर्रम, संमेलनाचे कार्याध्यक्ष अ‍ॅड़ यु़ एऩ बेरिया, राष्ट्रीय उर्दू भाषा विकास परिषदेचे असिस्टंट एज्युकेशन आॅफिसर डॉ़ मो़ फेरोज शेख, बज्मचे अध्यक्ष बशीर परवाज, सोशल प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आसिफ इक्बाल, डॉ़ गौस शेख, मनोरमा परिवाराचे प्रमुख श्रीकांत मोरे, प्रसिद्ध गायक मो़ अयाज आणि नगरसेवक चेतन नरोटे यांची प्रमुख उपस्थिती होती़ सुशीलकुमार शिंदे पुढे म्हणाले, उर्दू साहित्याच्याप्रति सोलापूरकरांचे त्या भाषेवरील प्रेम हे नऊ दिवसातील ६० लाखांच्या साहित्य खरेदीवरून दिसून येत असल्याचे स्पष्टीकरण देत या भाषेचा विकास आणि विस्तार हा तालुकास्तरावरून खºया अर्थाने व्हायला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली़ शाहू महाराज हे खरोखरच इन्क्लाब का बादशहा असल्याचे म्हणाले़ प्रारंभी जयसिंग पवार लिखित शाहू महाराज पुस्तकाचे प्रकाशन झाले़ प्रास्ताविकेतून माजी महापौर अ‍ॅड़ यु़ एऩ बेरिया म्हणाले, संगणक युगात आजची पिढी ही साहित्यापासून दूर जात आहे़ ही पिढी सारे काही गुगलवर शोधते आहे, अशा स्थितीत उर्दू ग्रंथ प्रदर्शनाने नव्या पिढीला वाचन संस्कृतीकडे वळवल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले़ यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा पारितोषिके देऊन त्यांचा गौरव करण्यात आला़ सूत्रसंचालन डॉ़ अब्दुल रशीद शेख यांनी केले तर आभार आसिफ इक्बाल यांनी मानले़ ------------------उर्दूसाठी केंद्र फार काही करत नाही : कमल सिंग- सर्वश्रुत आणि सर्वप्रिय असणाºया उर्दूचे पुस्तक संमेलन सोलापुरात यशस्वीरित्या ठरल्याचे गौरवोद्गार काढत महाराष्ट्रात या उर्दूचे स्थान उंचावण्याची आवश्यकता असल्याची अपेक्षा अ़ भा़ उर्दू भाषा विकास परिषदेचे सहायक संचालक कमल सिंग यांनी व्यक्त केली़ अशा उर्दूच्या बाबतीत बोलायचे झाले तर १२९१ स्टडी सेंटर आहेत आणि केंद्र सरकार याशिवाय या भाषेच्याप्रति फार काही करत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली़----------------६० लाखांची साहित्य विक्री- या ९ दिवसीय ग्रंथ प्रदर्शनात शेवटच्या दिवसापर्यंत ६० लाख १७ हजार २४० रुपयांच्या ग्रंथसंपदेची विक्री झाल्याची माहिती सोशल प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आसिफ इक्बाल यांनी याप्रसंगी जाहीर केली़ या ९ दिवसीय संमेलनात विविध प्रकारची हिंदी आणि उर्दूसह मराठी भाषेतील भाषांतरित पुस्तके मोठ्या प्रमाणात विकली गेल्याचा उल्लेख करीत यावरून या शहराचे उर्दूवरील प्रेम स्पष्ट होते, असे म्हणाले़ ------------------लग्नाची नोंद शासन दरबारी ठेवण्याचा आग्रह शाहूंनी धरला होता : वसुधा पवारया प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बोलताना आज सरकारने ‘तलाक’संबंधी घेतलेल्या निर्णयाचा धागा पकडत छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळी सर्व जाती-धर्मातील विवाह हे रजिस्टर पद्धतीने शासन दरबारी नोंदीत ठेवण्याचा आग्रह धरला होता, याची आठवण करून दिली़ आज मुस्लीम भगिनींनी त्याकाळी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचा विचार करावा, असे सांगत समतेचा विचार शाहू महाराजांनी प्रभावीपणे मांडल्याचे म्हणाल्या़ त्या पुढे म्हणाल्या, शाहू महाराजांचे सर्वाधिक प्रेम हे मुस्लीम समाजावर होते़ तळागाळातील समाजातील दु:ख निवारण हे शिक्षणाशिवाय होणार नाही, हे शाहू महाराजांनी त्याकाळी ओळखून २१ वसतिगृहे बांधली़ मुस्लीम विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह काढून दिले, त्यासाठी त्यांनी जमीन दिली़ हा समाज लवकरात लवकर पुढे यावा म्हणून जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केला़

टॅग्स :SolapurसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदे