सांगोल्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळीची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:21 AM2021-03-22T04:21:20+5:302021-03-22T04:21:20+5:30

सांगोला : गेल्या दोन दिवसांपासून सांगोला शहर व तालुक्यात वातावरणातील ढगाळ वातावरणामुळे पावसाची चिन्हे दिसून येत होती. अशातच रविवारी ...

Untimely attendance with lightning in Sangola | सांगोल्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळीची हजेरी

सांगोल्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळीची हजेरी

Next

सांगोला : गेल्या दोन दिवसांपासून सांगोला शहर व तालुक्यात वातावरणातील ढगाळ वातावरणामुळे पावसाची चिन्हे दिसून येत होती. अशातच रविवारी सायंकाळी ६च्या सुमारास अचानक विजेच्या कडक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. उन्हाळ्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काही वेळ का होईना थंड हवेचा दिलासा मिळाला मात्र, शेतकऱ्यांची झोपच उडाली आहे. या पावसाचा फटका द्राक्षे, आंबा, डाळिंब फुलोरा फळपिकांना बसणार असून, काढणीला आलेला गहू, हरभरा, ज्वारी शेती पिके काळी पडण्याची शक्यता आहे.

रविवारच्या अवकाळीने शेतकरी धास्तावला आहे. दरम्यान, अचानक पावसाला सुरुवात झाल्यामुळे सांगोला शहरातील आठवडा बाजारात दुकानदार व्यापारी ग्राहकांची चांगलीच धावपळ उडाली.

गतवर्षी ऐन मार्च महिन्यात लॉकडाऊनमुळे या परिसरातील द्राक्ष उत्पादनाचा हंगाम संकटात सापडला. कवडीमोल दराने शेतकऱ्यांना द्राक्ष विकण्याची वेळ आली. या संकटातून सावरून पुन्हा यंदाच्या द्राक्ष उत्पादनासाठी कंबर कसली असताना छाटणीच्या काळात ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीेने घात केला. वेलीमध्ये अन्नसाठाच होऊ न शकल्याने घड निर्मिती झाली नाही. जे घड निघाले ते कमकुवत निर्माण झाल्याने जागीच जिरल्याने मोठे नुकसान झाले.

यंदा समाधानकारक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारी हरभरा गहू मका शेतीपिके मोठ्या प्रमाणात घेतली आहेत. द्राक्षे, केशरी आंबा लागवड ही मोठ्या केली आहे. सध्या ज्वारी गहू हरभऱ्याची काढणी मोडणी सुरू आहे. बहुतांश ठिकाणी ज्वारी गहू हरभऱ्याची खळी सुरू असून शेतकऱ्याची लगबग सुरू आहे. द्राक्षेबागा बहरलेल्या असून, आंब्याच्या बागा मोहर आणि कैऱ्यांनी लखडल्या आहेत. सर्वत्र शेतातून कडबा पडल्याने नुकसानीची शक्यता आहे, तर दुसरीकडे गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आत असताना रविवारी सायंकाळी ६च्या सुमारास अचानक बिगर मौसमी अवकाळी पावसात सुरुवात होताच शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. सुमारे १० ते १५ मिनिटे झालेल्या अवकाळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. ग्रामीण भागात अधून-मधून विजांचा कडकडाट सुरू होता, तर रिमझिम पाऊस सुरू असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

Web Title: Untimely attendance with lightning in Sangola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.