शहरं
Join us  
Trending Stories
1
अन्नधान्याच्या वाढलेल्या किंमती महागाई रोखण्यात अडथळा; RBI गव्हर्नरांचे महत्वाचे वक्तव्य
2
मोठी बातमी! पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; सहा महिला जागीच ठार, एक गंभीर
3
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; आक्रमक ओबीसी आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखला
4
Reliance Jio : जिओचे नेटवर्क बंद!; इंटरनेटपासून फायबरपर्यंत सर्वच बंद झाल्याने युजर्सचा संताप
5
शेतकऱ्यांनो खात्यात खटाखट खटाखट २००० रुपये आले का? मोदींनी एक बटन दाबले, २० हजार कोटी वळते केले
6
सन्मान निधीनंतर आता कोट्यवधी शेतकऱ्यांना NDA सरकार देणार आणखी एक गिफ्ट?
7
'अ‍ॅनिमल पार्क'संदर्भात रणबीर कपूरच्या सहकलाकाराने दिली मोठी अपडेट, म्हणाला- "सिनेमाची कथा..."
8
पुढच्यावेळी रॉबर्ट वाड्रा संसदेत दिसणार?; प्रियंका गांधी वायनाडला जाताच पतीची घोषणा
9
लोकसभा अध्यक्षाची निवड कशी केली जाते? कोणते अधिकार मिळतात? जाणून घ्या...
10
सरकारचा एक निर्णय अन् लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; RTE प्रवेश पुन्हा रखडले
11
वयाच्या चाळीशीतही अभिनेत्रीच्या हॉटनेसची चर्चा; साऊथ नंतर आता बॉलिवूडमध्येही बोलबाला
12
मुंबई, पाटणा, जयपूर, कोलकाता...देशभरातील 40 विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
13
वर्षा गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा; काँग्रेस- शिवसेनेचे आणखी काही आमदार राजीनामा देणार
14
खळबळजनक! T20 World Cup मध्ये मॅच फिक्सिंगचा प्रयत्न, वेगवेगळ्या नंबरवरून आले फोन
15
ना आलिया भट, ना ऐश्वर्या अन् नाही कतरिना, ही आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री
16
फडणवीसांशिवाय मंत्रिमंडळात भाजप असणे अशक्य; राष्ट्रवादीच्या मंत्र्याचे खळबळजनक वक्तव्य
17
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे लोकार्पण कधी? उद्धव ठाकरेंनी केली बांधकामाची पाहणी
18
सुख-शांती हिरावून घेऊ शकतं स्मार्टफोनचं व्यसन; 'या' आजारांचा धोका, काय आहे Nomophobia?
19
पश्चिम बंगालमध्ये नवा ट्विस्ट! CM ममता बॅनर्जी भाजपा खासदाराच्या घरी; चर्चांना उधाण
20
"पप्पा फक्त एकदा परत या आणि..."; शहीद वडिलांना आजही व्हॉईस मेसेज पाठवतो ७ वर्षांचा लेक

भाजप-सेनेला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय हा जनसंघर्ष थांबणार नाही, अशोक चव्हाण यांना घणाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 3:10 PM

मंगळवेढा : भाजप शिवसेनेला जनतेच्या प्रश्नांची जाणच नाही त्यामुळे ते प्रश्न सोडवू शकत नाहीत. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा काँग्रेसचेच सरकार आणले पाहिजे त्यासाठीच हा जनसंघर्ष सुरु असून भाजप शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय हा जनसंघर्ष थांबणार नाही असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमितीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला आहे मंगळवेढा तालुका ...

ठळक मुद्देखा़ चव्हाण यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली मंगळवेढा तालुका काँग्रेस च्या वतीने जनसंघर्ष यात्रेचे स्वागत भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे राज्याची अधोगती

मंगळवेढा : भाजप शिवसेनेला जनतेच्या प्रश्नांची जाणच नाही त्यामुळे ते प्रश्न सोडवू शकत नाहीत. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा काँग्रेसचेच सरकार आणले पाहिजे त्यासाठीच हा जनसंघर्ष सुरु असून भाजप शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय हा जनसंघर्ष थांबणार नाही असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमितीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला आहे

 मंगळवेढा तालुका काँग्रेस च्या वतीने जनसंघर्ष यात्रेचे स्वागत करण्यात आहे त्यांनतर बाजार मैदानात सभा पार पडली़ त्यावेळी ते बोलत होते़   व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आ भारत भालके, आ रामहरी रुपनवर, आ विश्वजित कदम, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, नगराध्यक्ष अरुणा माळी, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, सुरेश कोळेकर, मारुती वाकडे, नगरसेवक राहुल सांवजी, महेश दत्तू,भारत बेदरे, दयानंद सोनगे, संतोष सोनगे, मल्लिकार्जुन बिराजदार ,  आदी उपस्थित होते 

मंगळवेढा येथे जनसंघर्ष सभेला मार्गदर्शन करताना खा़ चव्हाण यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली ते म्हणाले की,  भाजप सरकारच्या चार वर्षाच्या सत्ताकाळात महाराष्ट्राचे वाटोळे झाले आहे. भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे राज्याची अधोगती झाली आहे. चार वर्षात घोटाळे करण्याशिवाय आणि खोटी आश्वासने देण्यापलिकडे या सरकारने काही केले नाही. राज्यात शेतकरी आत्महत्या करित आहेत. बेरोजगारीला कंटाळून सुशिक्षित बेरोजगार तरूण आत्महत्या करित आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा व इतर समाजातील तरूण आत्महत्या करित आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी सरकार प्रश्न चिघळवत ठेवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करित आहे. राजकीय फायद्यासाठी राज्यात सामाजिक तेढ निर्माण करण्याचे काम सत्ताधा-यांकडून सुरु आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेही भाषण झाले़

टॅग्स :SolapurसोलापूरCongress Jan Sangharsh Yatraकाँग्रेस जनसंघर्ष यात्राAshok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाShiv Senaशिवसेना