ऊसाची मोळी अंगावर पडून पती-पत्नीचा दुदैवी मृत्यू, करमाळाजवळील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 15:55 IST2017-11-21T15:55:08+5:302017-11-21T15:55:24+5:30
करमाळयाजवळ रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे ओव्हरलोड ऊस वाहतुक करणाºया ट्रकमधील मोळी अंगावर पडून रस्त्यांच्या कडेला थांबलेल्या वयोवृध्द पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना मंगळवार २१ नोव्हेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली़

ऊसाची मोळी अंगावर पडून पती-पत्नीचा दुदैवी मृत्यू, करमाळाजवळील घटना
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २१ : करमाळयाजवळ रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे ओव्हरलोड ऊस वाहतुक करणाºया ट्रकमधील मोळी अंगावर पडून रस्त्यांच्या कडेला थांबलेल्या वयोवृध्द पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना मंगळवार २१ नोव्हेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली़ साहेबराव चांदणे व मिराबाई चांदणे अशी मृत दोघा पती-पत्नीची नावे आहेत़ हे दोघे रस्त्यांच्या कडेला शेळ्यासाठी शिवरीचा पाला काढीत होते़ तेवढ्यात जवळून जाणाºया ट्रकमधील ऊसाची मोळी अचानक अंगावर पडली़ यात जीव गुदमरून दोघांचाही जागीच मृत्यू झाला़ घटनेनंतर करमाळा पोलीसांनी घटनास्थळाला भेट दिली असून मृतांना शवविच्छेदनासाठी वैराग ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे़