शेतातील दगड नेणाऱ्या ट्रॅक्टरखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:27 IST2021-09-04T04:27:09+5:302021-09-04T04:27:09+5:30
चिरडून शिरभावीत चालक ठार लोकमत न्यूज नेटवर्क सांगोला : शेतातील दगड भरून निघालेला ट्रॅक्टर अचानक चढावर उलटला. या ...

शेतातील दगड नेणाऱ्या ट्रॅक्टरखाली
चिरडून शिरभावीत चालक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगोला : शेतातील दगड भरून निघालेला ट्रॅक्टर अचानक चढावर उलटला. या ट्रॅक्टरखाली चिरडून चालक जागेवर मरण पावला.
दादासाहेब बोडरे (२५), असे चिरडून मरण पावलेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव असून, शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास सांगोला तालुक्यात शिरभावी येथील होवाळ वस्ती येथे ही घटना घडली. याबाबत गणेश प्रभाकर बोडरे (रा. शिरभावी, ता.सांगोला) यांनी फिर्याद दिली आहे.
शुक्रवारी दुपारी १२ दरम्यान होवाळवस्ती येथील मारुती सावंत यांच्या शेतातील दगड-गोटे बोडरे याने डम्पिंग ट्रॅक्टर ट्रॉलीमधून भरले. ट्रॅक्टर चढावर येताच ते उलटले. उलटलेल्या ट्रॅक्टरखाली बोडरे सापडून चिरडला गेला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला.
ही घटना शेतमालक मारुती सावंत यांनी पाहिली आणि आनंद होवाळ यास फोन करून याची माहिती दिली. ही घटना समजताच सचिन साळुंखे, गणेश बोडरे, परमेश्वर मस्के, सीताराम माने यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जेसीबीच्या साह्याने ट्रॅक्टर बाजूला केले. जखमी दादासाहेब बोडरे यास बाहेर काढून उपचाराकरिता सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.