शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

दौंडमधून उजनी धरणात १, ४८२ चा विसर्गाने पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 12:44 IST

भीमानगर : पुणे परिसरात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे पुणे जिल्ह्यातील दौंड येथून ९८८ क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला. त्यानंतर यात वाढ होऊन १ हजार ४८२ क्युसेक्सने विसर्ग उजनी धरणात सोडण्यात येत आहे. पावसाळा सुरू होऊन महिना लोटला तरीही अद्याप दमदार पाऊस झाला नाही. यामुळे पावसाबरोबरच धरण कधी भरेल, याकडे संपूर्ण ...

ठळक मुद्देपावसाळा सुरू होऊन महिना लोटला तरीही अद्याप दमदार पाऊस झाला नाहीपुणे परिसरात दोन दिवसांपासून पावसाची संततधारसीना बोगद्यातून पाणी सोडण्याची  मागणी

भीमानगर : पुणे परिसरात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे पुणे जिल्ह्यातील दौंड येथून ९८८ क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला. त्यानंतर यात वाढ होऊन १ हजार ४८२ क्युसेक्सने विसर्ग उजनी धरणात सोडण्यात येत आहे. 

पावसाळा सुरू होऊन महिना लोटला तरीही अद्याप दमदार पाऊस झाला नाही. यामुळे पावसाबरोबरच धरण कधी भरेल, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. अद्यापही पुणे येथील धरण क्षेत्रात पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडत नाही. राज्यात मुंबई, विदर्भ, कोकण या भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे; मात्र पुणे येथील धरण क्षेत्रात पावसाने हजेरी लावली नाही.

उजनीच्या वरच्या बाजूला जवळपास १८ ते १९ धरणे असून अजूनही या क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडला नाही. पावसाळा अजूनही तीन ते साडेतीन महिने असून हवामान खात्याने चालूवर्षी समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला आहे. तरीही पाऊस पडत नसल्याने उजनीतून नदी, कालवा, सीना बोगद्यातून पाणी सोडण्याची  मागणी येत्या काही दिवसात शेतकरी वर्गातून होणार आहे. 

उजनीची सध्यस्थिती- एकूण पाणी पातळी ४८९.५५० दलघमी- एकूण पाणीसाठा १५३०.२० दलघमी- उपयुक्त पाणीसाठा -२६२.६१ दलघमी- टक्केवारी -१७.९७ टक्के - दौंड येथून धरणात विसर्ग १,४८२ क्युसेक्स

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणWaterपाणीPuneपुणेRainपाऊस