उजनीची टक्केवारी ४० टक्के; एकूण पाणीसाठा झाला ८४.५९ टीएमसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:23 IST2021-07-28T04:23:26+5:302021-07-28T04:23:26+5:30
मंगळवारी सकाळी सहा वाजता १४,३००, दुपारी बारा वाजता १३,१३१, तर सायंकाळी १२,३०० क्युसेक विसर्ग उजनीत येत होता, तर दौंडमधून ...

उजनीची टक्केवारी ४० टक्के; एकूण पाणीसाठा झाला ८४.५९ टीएमसी
मंगळवारी सकाळी सहा वाजता १४,३००, दुपारी बारा वाजता १३,१३१, तर सायंकाळी १२,३०० क्युसेक विसर्ग उजनीत येत होता, तर दौंडमधून मंगळवारी सकाळी सहा वाजता १५,५९७, दुपारी बारा वाजता १२,७१६, सायंकाळी सहा वाजता ११,२२१ विसर्ग उजनीत येत होता.
एकंदरीत उजनीत गेल्या दहा दिवसांत समाधानकारकरीत्या पाणीसाठा जमा झाला. आतापर्यंत ६३ टक्के पाणीसाठा झाला असून, अजूनही गेल्या वर्षीप्रमाणे १११ टक्के पाणी साठा होण्यासाठी ४८ टक्के पाणी येणे गरजेचे आहे.
उजनीची सद्य:स्थिती
एकूण पाणी पातळी : अ४९३.६८० मीटर
एकूण पाणीसाठा : ३९५.४९० दलघमी टीएमसी ८४.५९
उपयुक्त पाणीसाठा : ५९.६८ दलघमी
टीएमसी २०.९३
टक्केवारी : ४०
टक्के
उजनी येणारा विसर्ग :
बंडगार्डन १३८३० क्युसेक,
दौंड : ११२२१ क्युसेक
-----