बायपासऐवजी टेंभुर्णी गावातून टाकणार उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 01:18 PM2020-10-23T13:18:15+5:302020-10-23T13:21:25+5:30

नवा प्रस्ताव : शेतकºयांनी केला होता विरोध, आता केवळ एका गावचे भूमापन बाकी

Ujani-Solapur parallel waterway will be diverted from Tembhurni village instead of bypass | बायपासऐवजी टेंभुर्णी गावातून टाकणार उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनी

बायपासऐवजी टेंभुर्णी गावातून टाकणार उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनी

Next
ठळक मुद्देउजनी ते सोलापूर पहिली जलवाहिनी रस्त्याच्या उजव्या बाजूने टाकण्यात आलीनवी जलवाहिनी बायपास रोडच्या बाजूने घेण्याचा प्रस्ताव होताबायपास रोडच्या कामात शेतकºयांचे, दुकानदारांचे मोठे नुकसान झाले

सोलापूर : उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनी टेंभुर्णी बायपासऐवजी टेंभुर्णी गावातून जाणाºया रस्त्यालगत टाकण्यात येणार आहे. यामुळे या कामात एक ते सव्वा कोटी रुपयांची बचत होणार असल्याचे सोलापूर डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन कंपनीचे कार्यकारी संचालक त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

उजनी ते सोलापूर पहिली जलवाहिनी रस्त्याच्या उजव्या बाजूने टाकण्यात आली. नवी जलवाहिनी बायपास रोडच्या बाजूने घेण्याचा प्रस्ताव होता. बायपास रोडच्या कामात शेतकºयांचे, दुकानदारांचे मोठे नुकसान झाले. जलवाहिनीच्या कामामुळे पुन्हा शेतकºयांचे नुकसान होईल. त्यामुळे ही जलवाहिनी इतरत्र वळवण्यात यावी, अशी मागणी येथील शेतकºयांनी केली होती. आमदार संजय शिंदे यांच्या उपस्थितीत यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात मनपा, स्मार्ट सिटीच्या अधिकाºयांसोबत बैठकही झाली होती. त्यानंतर ही जलवाहिनी टेंभुर्णी गावातून रस्त्याच्या दुसºया बाजूने टाकण्याचा प्रस्ताव जीवन प्राधिकरणाने तयार केला. नव्या प्रस्तावामुळे ४०० मीटरचे अंतर कमी होईल. पाईपलाईनच्या कामात सुमारे एक कोटी रुपये आणि भूसंपादनाच्या कामातही २० ते २५ लाख रुपयांची बचत होणार आहे.
----

नुकसानभरपाईचा प्रस्ताव लवकरच
समांतर जलवाहिनीची वर्कआॅर्डर आॅगस्ट २०१९ मध्ये देण्यात आली. वर्कआॅर्डर देण्यापूर्वी महापालिका, स्मार्ट सिटीच्या अधिकाºयांनी भूसंपादनाचे काम पूर्ण करुन घेणे अपेक्षित होते. परंतु, याकडे दुर्लक्ष करुन थेट वर्कआॅर्डर देण्यात आली. ढेंगळे-पाटील यांनी भूसंपादनाच्या उर्वरित कामांना गती दिली. सध्या केवळ टेंभुर्णी गावातील मोजणीचे काम शिल्लक आहे. नुकसानभरपाईच्या मूल्यांकनाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर होणार आहे.

----
पाईपलाईनच्या कामावर दृष्टिक्षेप

  • उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनी - ११० किमी लांबी
  • एकूण ३६ गावातील गटांचे तात्पुरते भूसंपादन
  • तीन ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग
  • दोन ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग क्रॉसिंग
  • एका ठिकाणी सीना नदी क्रॉसिंग
  • आठ ठिकाणी राज्य महामार्ग क्रॉसिंग
  • ६० ठिकाणी जिल्हा, ग्रामीण, इतर मार्गांचे क्रॉसिंग

Web Title: Ujani-Solapur parallel waterway will be diverted from Tembhurni village instead of bypass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.