शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

मालट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोन तरूण ठार, सोलापूर- हैद्राबाद रोडवरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 10:43 IST

सोलापूर : हैदराबाद रोडवरील आकाश हॉस्पिटलसमोर मालट्रकने दिलेल्या धडकेत मोटरसायकलवरील दोन तरूण ठार झाले. हा अपघात बुधवारी सायंकाळी ५.३0 ...

ठळक मुद्देरस्त्यावर अपघात झाल्यानंतर हैदराबाद रोड परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केलीगर्दीमुळे रस्त्यावर बराच वेळ ट्रॅफिक जाम झाला होताएमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी

सोलापूर : हैदराबाद रोडवरील आकाश हॉस्पिटलसमोर मालट्रकने दिलेल्या धडकेत मोटरसायकलवरील दोन तरूण ठार झाले. हा अपघात बुधवारी सायंकाळी ५.३0 वाजता घडला. 

राजेंद्र शिवाजी पवार (वय-२१), रंगनाथ श्रीमंत देवगुडे (वय-२0, दोघे रा. बिंबलवाडी, ता. केज, जि़ बीड) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. हे दोघे मोटरसायकल (क्र.एम.एच.२५, एबी-३२९३)वरून सोलापूरहून हैदराबाद रोडच्या दिशेने जात होते. आकाश हॉस्पिटल येथे वळण घेत असताना समोरून येणाºया मालट्रक (क्र.के.ए.५६, ३५९३) ने जोरात धडक दिली. या धडकेत राजेंद्र पवार हा तरूण गंभीर जखमी होऊन जागेवरच ठार झाला. 

रंगनाथ देवगुडे याला उपचारासाठी जोडबसवण्णा चौकातील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. अज्ञात ट्रक चालकाविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

अपघातानंतर रस्त्यावर बघ्यांची गर्दी...रस्त्यावर अपघात झाल्यानंतर हैदराबाद रोड परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली होती. गर्दीमुळे रस्त्यावर बराच वेळ ट्रॅफिक जाम झाला होता. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी आल्यानंतर अ‍ॅम्ब्युलन्स बोलावून घेण्यात आली. पंचनामा करून मयत राजेंद्र पवार याचा मृतदेह शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आला. बराच वेळ दोन्ही तरूणांची ओळख पटत नव्हती. प्रथमत: अज्ञात दोन तरूण अशी नोंद झाली होती. 

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षाDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी