धार्मिक कार्यक्रमासाठी निघालेल्या महिलांना ट्रकने उडविले; दोन महिलांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 11:59 IST2025-08-03T11:58:41+5:302025-08-03T11:59:00+5:30

पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे.

Two women killed after truck hits women on way to religious event in Mangalwedha | धार्मिक कार्यक्रमासाठी निघालेल्या महिलांना ट्रकने उडविले; दोन महिलांचा मृत्यू

धार्मिक कार्यक्रमासाठी निघालेल्या महिलांना ट्रकने उडविले; दोन महिलांचा मृत्यू

- विलास मासाळ

मंगळवेढा : धार्मिक कार्यक्रमासाठी निघालेल्या दोन महिलांना कांद्याने भरलेला ट्रकने धडक दिल्याने दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी पावणे आठच्या दरम्यान दामाजी कारखाना रोड येथील बायपासवर घडली.

या अपघातात दोन महिला असून या दोघेही सासु -सुना आहेत. रेणुका विजय तासगावकर (वय ४०) तर शालिनीताई पांडुरंग तासगावकर (वय ६५) अशी त्यांची नावे आहेत. या दोघी नेहमीप्रमाणे टोलनाक्याच्या पलीकडील धार्मिक कार्यक्रमासाठी सकाळी धर्मगाव रोडवरील त्यांच्या घरातून साडेसात वाजता दुचाकी एमएच १३ पीएम ३०८४ यावरून निघाल्या होत्या. त्या धर्मगाव बायपास रोड वरून पूर्वेकडे कारखाना चौकात जात असताना पंढरपूरहून पाठीमागून आलेल्या केए ०१ एई ६२९१ या ट्रकने जोरदार पाठीमागून येऊन जोराची धडक दिली. त्यात त्या दोघींचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे.

Web Title: Two women killed after truck hits women on way to religious event in Mangalwedha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात