सोलापूर-हैद्राबाद रोडवर दुचाकी-ट्रकचा अपघात; दोन तरूणांचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 12:32 PM2020-10-17T12:32:02+5:302020-10-17T12:32:57+5:30

सोलापूर-हैद्राबाद रोडवरील घटना; वडजी गावावर पसरली शोककळा

Two-wheeler-truck accident on Solapur-Hyderabad road; Two youths died on the spot | सोलापूर-हैद्राबाद रोडवर दुचाकी-ट्रकचा अपघात; दोन तरूणांचा जागीच मृत्यू

सोलापूर-हैद्राबाद रोडवर दुचाकी-ट्रकचा अपघात; दोन तरूणांचा जागीच मृत्यू

Next
ठळक मुद्दे संदीप सिताराम गडदे (वय २२, रा. वडजी, ता़ दक्षिण सोलापूर), नितीन बापू थोरात (वय १९, रा़ वडजी) असे मृत झालेल्या दोघांचे नावशुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त संदीप व नितीन हे दोघे  दुचाकीवरून सोलापूरकडे येत होते

सोलापूर : हैद्राबाद रस्त्यावर  हॉटेल सहारासमोर ट्रकच्या धडकेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडजी गावातील एकूनत्या एक असलेल्या दोन तरुणांचा दुदैवी मृत्यू झाला. संदीप सिताराम गडदे (वय २२, रा. वडजी, ता़ दक्षिण सोलापूर), नितीन बापू थोरात (वय १९, रा़ वडजी) असे मृत झालेल्या दोघांचे नाव आहे़  या घटनेमुळे वडजी गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त संदीप व नितीन हे दोघे  दुचाकीवरून सोलापूरकडे येत होते़  हॉटेल सहारा समोर आले असता पाठीमागून येणाºया ट्रकने त्यांना ठोकरले. त्या दोघांनाही मदतनीस गोकुळ हवालदार यांनी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतू गंभीर जखमी होऊन रक्तस्त्राव झाल्याने उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

या अपघाताची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे. दरम्यान, संदीप हा बीएसएनएल मध्ये कामाला होता तर त्यांचे वडील शेती करत होते़ तर नितीन यांचे वडील हे सालगडी आहेत़ हे दोघेही एकूनते एक होते अशी माहिती गोकुळ हवालदार यांनी दिली. 

Web Title: Two-wheeler-truck accident on Solapur-Hyderabad road; Two youths died on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.