सोलापुरात अज्ञात वाहनाची दुचाकीला उडक, दुचाकीस्वार बेशुद्ध, एक जखमी
By विलास जळकोटकर | Updated: June 19, 2023 18:12 IST2023-06-19T18:12:27+5:302023-06-19T18:12:45+5:30
रविवारच्या मध्यरात्री १२:३० च्या सुमारास हा अपघात झाला. यात तमन्ना बंडगर (वय- २५) हा बेशुद्ध झाला.

सोलापुरात अज्ञात वाहनाची दुचाकीला उडक, दुचाकीस्वार बेशुद्ध, एक जखमी
सोलापूर : कर्नाटातील बळोलीहून सोलापूरकडे येणाऱ्या दुचाकीला अज्ञात वाहनानं उडवल्यानं दुचाकी चालवणारा तरुण बेशुद्ध झाला तर दुसरा जखमी झाला. तेरा मैल रोडवरील एका खासगी हाॅस्पिटजवळ रविवारच्या मध्यरात्री १२:३० च्या सुमारास हा अपघात झाला. यात तमन्ना बंडगर (वय- २५) हा बेशुद्ध झाला. तर प्रशांत सागाई (वय- २७) हा जखमी झाला. यातील जखमी तमन्ना बंडगर व प्रशांत सागाई हे दोघे इंडी तालुक्यातील बळोली येथून सोलापूरकडे दुचाकीवरुन येत होते.
रविवारच्या रात्री साडेचाराच्या सुमारास त्यांची दुचाकी तेरामैल रोडवरील एका हॉस्पिटलजवळ आली असताना चारचाकी वाहनानं त्यांना धडक दिल्याने दोघेही रोडवर पडले. यामध्ये तमन्ना याचया डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांची शुद्ध हरपली. प्रशानत याला पायाला खरचटले.
अपघाताचे वृत्त समजताच रुग्णवाहिकेतून दोघांना डाॅ. रत्नप्पा कुंभार यांनी तातडीने शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले. यातील एकजण बेशुद्ध असून, दुसऱ्याला उपचार करुन सोमवारी सकाळी डिस्चार्ज देण्यात आला. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.