शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

शहर मध्य, सांगोला, पंढरपुरात लागणार दोन ईव्हीएम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 3:20 PM

सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक : मतदारांचा टक्का वाढला

ठळक मुद्देजिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघासाठी २३७ उमेदवारांनी अर्ज भरलेआता निवडणूक रिंगणात १५४ उमेदवार उरले आहेतसोलापूर शहर मध्य, सांगोला व पंढरपुरात प्रत्येकी २० उमेदवार निवडणूक रिंगणात

सोलापूर : विधानसभेच्या जिल्ह्यातील अकरा जागांसाठी १५४ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सोलापूर शहर मध्य, सांगोला व पंढरपुरात प्रत्येकी २० उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान नोंदविण्यासाठी दोन ईव्हीएम मशीन्स लागणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. 

जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघासाठी २३७ उमेदवारांनी अर्ज भरले होते. सोमवारी अर्ज माघारी घेण्यादिवशी ८३ जणांनी माघार घेतली. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात १५४ उमेदवार उरले आहेत. मतदारसंघनिहाय उमेदवारांंची संख्या पुढीलप्रमाणे आहे. करमाळा: ८ (माघार: १०), माढा: १० (६), बार्शी: १४ (६), मोहोळ: १४ (८), सोलापूर शहर उत्तर: १५ (१), सोलापूर शहर मध्य: २० (७), अक्कलकोट: ११ (६), दक्षिण सोलापूर: १४ (१२), पंढरपूर: २० (८), सांगोला: २० (११), माळशिरस: ८ (८). एका ईव्हीएम मशीनवर १५ उमेदवार व एक नोटा असे १६ मतदान नोंदविण्याची सोय आहे. तीन मतदारसंघात २० उमेदवार असल्याने आता या ठिकाणी दोन मशीन्स लावाव्या लागणार आहेत. 

मतदारसंघनिहाय दोन मशीन्स लागणाºया विधानसभा मतदारसंघांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. शहर मध्य: मतदान केंद्र: २९३, लागणाºया ईव्हीएम: ७०४, सांगोला: मतदान केंद्र: २९१, ईव्हीएम: ६९९, पंढरपूर: ३२८, ईव्हीएम: ७८७. निवडणूक आयोगाने जादा मशीन्सचा अगोदरच पुरवठा केलेला आहे. उपलब्ध मशीन्स: ईव्हीएम: ६५०५, कंट्रोल युनिट: ४५८९, व्हीव्हीपॅट: ४६९५. एकूण लोकसंख्येच्या ७२.७२ टक्के इतके मतदार आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात मनुष्य लिंग प्रमाण ९१८ असायला हवे होते. लोकसभेसाठी हे प्रमाण ९१० होते तर आता विधानसभेसाठी ९११ इतके झाले आहे. मतदार जागृती कार्यक्रमामुळे ही वाढ झाल्याचा दावा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. भोसले यांनी केला. 

१३ हजारांनी मतदार वाढले- जिल्ह्याची लोकसंख्या ४७ लाख २३ हजार इतकी आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी ३४ लाख २१ हजार ३२४ इतके मतदार होते. विधानसभेसाठी ३१ आॅगस्टपर्यंत मतदार यादी अंतिम करण्यात आल्यावर नोकरदार मतदारांसह एकूण मतदारांची संख्या ३४ लाख २५ हजार ८४३ इतकी होती. त्यानंतर फॉर्म ६ भरून ४ आॅक्टोबरपर्यंत नवीन मतदार नोंदणी घेण्यात आली. त्यात १३ हजार २२५ नवीन मतदारांची भर पडली आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी ३४ लाख ३४ हजार ५४९ मतदारांची झाली आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयEVM Machineएव्हीएम मशीन