चारापाणी करुन घरात झोपले, बाहेर म्हशीसह रेडीही पळवली

By काशिनाथ वाघमारे | Updated: August 1, 2023 20:09 IST2023-08-01T20:09:42+5:302023-08-01T20:09:50+5:30

ही घटना मंगळवार, १ ऑगस्ट रोजी पहाटे ५ च्या सुमारास सांगोला तालुक्यात महूद येथे घडली.

two buffalo stolen from outside house in solapur | चारापाणी करुन घरात झोपले, बाहेर म्हशीसह रेडीही पळवली

चारापाणी करुन घरात झोपले, बाहेर म्हशीसह रेडीही पळवली

सोलापूर : घरासमोर बांधलेल्या म्हशीला आणि रेडीला चारापाणी करुन पशुपालक घरात झोपी गेला. पहाटे बाहेर डोकावले असता दारात बांधलेली म्हैस अन रेडी चाेरट्यांनी पळवल्याचे निदर्शनास आले.

ही घटना मंगळवार, १ ऑगस्ट रोजी पहाटे ५ च्या सुमारास सांगोला तालुक्यात महूद येथे घडली. याबाबत, समीर जैनुद्दीन मुलानी (रा. महूद ता. सांगोला) यांनी सांगोला पोलिसात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी, समीर मुलाणी यांनी शेतीला जोड धंदा म्हणून दोन म्हशी घेतल्या. सोमवारी रात्री त्यांनी घरासमोर बांधलेल्या म्हशीला चारापाणी केले. त्यानंतर जेवण उरकून घरात झोपले. चोरट्याने मध्यरात्री गाभण म्हैस व रेडी चोरून नेली.

दरम्यान समीर मुलाणी मंगळवार, १ ऑगस्ट रोजी पहाटे पाचच्या सुमारास झोपेतून उठून बाहेर डोकावले असता घरासमोर बांधलेली म्हैस व रेडी दिसून आली नाही. शोध घेतला असता ओढ्यातील चिखलामधून म्हैस व रेडी पलीकडे घेऊन गेल्याचे दिसले.

Web Title: two buffalo stolen from outside house in solapur