शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

अहोरात्र झटून उजनी धरणावर उभारली दुबार पंपिंगची यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 10:40 IST

 उजनी धरणातील पाणीपातळी उणे ३५ टक्क्यांखाली; २३ पंपांद्वारे उपशाला सुरूवात

ठळक मुद्देशहराला उजनी ते पाकणी जलवाहिनी, औज ते सोरेगाव आणि हिप्परगा तलाव या तीन योजनांमधून पाणीपुरवठा होतो. हिप्परगा तलाव कोरडा पडल्याने उर्वरित दोन योजनांमधून पाणीपुरवठा सुरू उजनी जलाशयावर महापालिकेचे पंपगृह आहे. जलाशयाच्या काठावर १५ मीटर खोलीची चर आहे, यातून पाणी उपसा केला जातो.

सोलापूर : उजनी धरणातीलपाणीपातळी उणे ३५ टक्क्यांखाली गेल्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने उजनी जलाशयातून दुबार पंपिंग सुरू केले आहे. धरणाच्या काठावर नव्याने यंत्रणा उभारण्यात आली आहे. उन्हाच्या झळा आणि रात्रीची धग सोसत धरणाच्या खोल पाण्यात उतरून कामगारांनी ३६ वीजपंपांच्या पार्ईप आणि वायरिंग जोडणीचे काम पूर्ण केले आहे. पुढील दोन महिने दोन वरिष्ठ अधिकारी आणि १५ कर्मचारी या ठिकाणी तैनात असणार आहेत. 

शहराला उजनी ते पाकणी जलवाहिनी, औज ते सोरेगाव आणि हिप्परगा तलाव या तीन योजनांमधून पाणीपुरवठा होतो. हिप्परगा तलाव कोरडा पडल्याने उर्वरित दोन योजनांमधून पाणीपुरवठा सुरू आहे. उजनी जलाशयावर महापालिकेचे पंपगृह आहे. जलाशयाच्या काठावर १५ मीटर खोलीची चर आहे. यातून पाणी उपसा केला जातो. 

उजनी जलाशयाची पाणीपातळी उणे ३५ टक्क्यांखाली गेल्यानंतर पंपगृहाच्या जॅकवेलपर्यंत पाणी पोहोचत नाही. त्यामुळे जलाशयात आणखी पुढे जाऊन पाणी उपसा  केला जातो. हे पाणी जॅकवेलच्या चरपर्यंत सोडण्यात येते.  यंदा उजनी धरण १०० टक्के भरले  होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर धरणातून नियोजनापेक्षा  जास्त पाणी सिंचनासाठी सोडण्यात आले. परिणामी धरणाची पाणीपातळी लवकर खालावली. 

उजनी धरणातील पाणीपातळीचा अंदाज आल्यानंतर मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने १५ एप्रिलपासून दुबार पंपिंगची तयारी सुरू केली होती. महापालिकेने या कामासाठी ३० लाख रुपयांची तरतूद करुन ठेवली आहे. यंत्रणा उभी करण्यासाठी एक कंत्राटदार नेमण्यात आला आहे. पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख गंगाधर दुलंगे, उपअभियंता संजय धनशेट्टी, सहायक अभियंता संतोष यलगुलवार, इलेक्ट्रिक सुपरवायझर नितीन अंबिगार यांच्यासह कर्मचाºयांनी उजनी जलाशयाच्या काठावर नव्याने यंत्रणा उभी करुन घेतली.

सोमवारी दुपारी १० अश्वशक्तीच्या पंपाची चाचणी घेण्यात आली. मंगळवारपासून नियमितपणे पाणी उपसा करुन जॅकवेलपर्यंत सोडण्यात येणार आहे. जून-जुलै महिन्यात पाउस पडल्यानंतर उजनी धरणातील पाणी पातळीत वाढ होईल. तोपर्यंत दुबार पंपिंगचे काम सुरू राहणार आहे. पाउस पडल्यानंतर ही सर्व यंत्रणा पुन्हा हटविण्यात येणार आहे. ही सर्व यंत्रणा पुन्हा पाकणी येथील पंपगृहात आणून ठेवण्यात येणार आहे.   

अशी आहे यंत्रणा 

  • - ५० अश्वशक्तीचे दोन पंप : एक पंप चालू, एक पंप पर्यायी
  • - ३० अश्वशक्तीचे चार पंप : दोन पंप चालू, दोन पंप पर्यायी
  • - १० अश्वशक्तीचे ३० पंप : २० पंप चालू, १० पंप पर्यायी
  • - या पंपांसाठी स्वतंत्र वीज पुरवठ्याची यंत्रणा

आजवर पाच वेळा दुबार पंपिंग- पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता संजय धनशेट्टी म्हणाले, २००८ पासून आजवर पाच वेळा दुबार पंपिंग करावे लागले आहे. यापूर्वी २०१६ मध्ये एप्रिल महिन्यात दुबार पंपिंग करण्यात आले होते. यंदा मात्र मे महिन्यात दुबार पंपिंग करावे लागले आहे. उजनी धरणाची पाणीपातळी उणे ५० टक्क्यांखाली गेली तर तिबार पंपिंग करावे लागेल. मागच्या वेळी ३० अश्वशक्तीचे दोन तर ५० अश्वशक्तीचा एक पंप वाढविण्यात आला आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणWaterपाणीwater shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूकdroughtदुष्काळ