सोलापूर विद्यापीठाचा मंगळवारी एकोणविसाव्वा वर्धापन दिन

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: July 31, 2023 19:25 IST2023-07-31T19:25:10+5:302023-07-31T19:25:21+5:30

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा मंगळवारी १९ वा वर्धापन दिन कार्यक्रम नियोजित आहे.

Twenty-ninth anniversary of Solapur University on Tuesday | सोलापूर विद्यापीठाचा मंगळवारी एकोणविसाव्वा वर्धापन दिन

सोलापूर विद्यापीठाचा मंगळवारी एकोणविसाव्वा वर्धापन दिन

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूरविद्यापीठाचा मंगळवारी, एक ऑगस्ट रोजी १९ वा वर्धापन दिन कार्यक्रम नियोजित आहे. सकाळी ८ वाजता विद्यापीठाच्या आवारात ध्वजारोहणाचा कार्यक्रम प्रभारी कुलगुरू डॉ. कामत यांच्या हस्ते होईल. त्यानंतर सकाळी ९ वाजता सोलापूर शहरातील हुतात्मा स्मृती मंदिर सभागृहात विविध पुरस्कारांचे वितरण सोहळा नियोजित आहे.

या समारंभास मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा प्रतिष्ठेचा व मानाचा जीवनगौरव पुरस्कार सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश उदय उमेश लळीत यांना प्रदान करण्यात येणार आहे. रोख ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Web Title: Twenty-ninth anniversary of Solapur University on Tuesday