पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या ट्रॅक्टर ला ट्रकची धडक; ५ भाविक ठार, ३० जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2022 23:18 IST2022-03-13T23:15:37+5:302022-03-13T23:18:08+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या ट्रॅक्टर ला ट्रकची धडक; ५ भाविक ठार, ३० जखमी
सोलापूर : सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर कोंडी जवळ पंढरपूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या ट्रॅक्टरला ट्रकची जोरदार धडक झाली. या धडकेत 40 ते 50 भाविक गंभीर जखमी झाले असून चार ते पाच भाविकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, या अपघातातील मृतांची आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. जखमीतील काही लोक तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथील भाविक असल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळाची माहिती मिळताच सोलापूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अपघातातील जखमींना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्याचे काम वेगाने सुरू आहे.