सोलापुरात ट्रक पेटला, गव्हाची राख! क्रेनद्वारे उचलावे लागले वाहन
By रवींद्र देशमुख | Updated: December 18, 2023 18:21 IST2023-12-18T18:21:30+5:302023-12-18T18:21:49+5:30
जवळपास पाच गाड्यांद्वारे पाणी मारुन आग आटोक्यात आणण्यात आल्याचे अग्निशामक दलाचे अधीक्षक केदार आवटे यांनी सांगितले.

सोलापुरात ट्रक पेटला, गव्हाची राख! क्रेनद्वारे उचलावे लागले वाहन
सोलापूर : सोलापूर-विजापूर बायपास हायवेवरुन गव्हाने भरलेला ट्रक पास होताना अचानक ट्रकने पेट घेतला. यात चालकाचे दोन्ही पाय भाजले गेले. सोमवारी देशमुख वस्तीजवळील रोडवर ही घटना उघडकीस आली. चालकाला तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. साबीर जिलेबा खान (वय- ३०, रा. तिमरपूर, राजस्थान) असे जखमी तरुणाचे नाव आहे. या घटनेची खबर पोलिसांना मिळताच कंट्रोलरुममधून अग्निशामक दलाला खबर देण्यात आली. क्रेनद्वारे रोडवरील वाहन बाजूला करण्यात आले. जवळपास पाच गाड्यांद्वारे पाणी मारुन आग आटोक्यात आणण्यात आल्याचे अग्निशामक दलाचे अधीक्षक केदार आवटे यांनी सांगितले.
यातील चालक साबीर हा राजस्थान येथून गव्हाची पोती भरलेला ट्रक घेऊन म्हैसूरकडे चालला होता. रात्रीचा प्रवास करीत हा ट्रक सोलापूर -विजापूर बायपासवरुन पास होत होता. अचानक देशमख वस्तीजवळ ट्रकने पेट घेतला. कोणीतही त्याला याची माहिती दिली तो पर्यंत गव्हाची पोत्याने चांगलाच पेट घेतला. ट्रकमधून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात चालकाचे दोन्ही पायही भाजले गेले.
तातडीने रुग्णवाहिकेला बोलावून घेण्यात आले, मित्र हरिप्रीतसिंग यांनी त्याला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार करण्यात आल्यानंतर काही तासानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.