शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

महापुरामुळे रस्ता चुकलेला ईव्हीएम घेऊन जाणारा ट्रक आला सोलापुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 1:14 PM

 ‘ईव्हीएम हॅक’च्या संशय; वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली घोषणाबाजी

ठळक मुद्देबंगळुरूहून पुण्याकडे निघालेला ईव्हीएमचा मशिनचा कंटेनर महापुरामुळे सोलापुरात दाखल झालाया कंटेनरसोबत आलेले महसूल अधिकारी, कंटेनर चालक, सुरक्षा रक्षक रविवारी मुक्कामालाविधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी बंगळुरू येथील भेल कंपनीकडून ईव्हीएम मागविले

सोलापूर : बंगळुरूहून पुण्याकडे निघालेला ईव्हीएमचा मशिनचा कंटेनर महापुरामुळे सोलापुरात दाखल झाला. या कंटनेरमध्ये हॅक झालेल्या ईव्हीएम असल्याचे मानून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी  या ट्रकसमोर घोषणाबाजी केली. या प्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात तक्रारही दिली. शंकेचे निरसन झाल्यानंतर कार्यकर्ते कंटेनरपासून बाजूला झाले. 

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाºया कार्यकर्त्यांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. बंगळुरूहून पुणे आणि जळगावकडे निघालेले ईव्हीएमचे कंटेनर शासकीय विश्रामगृहात थांबला होता़ या कंटेनरसोबत आलेले महसूल अधिकारी, कंटेनर चालक, सुरक्षा रक्षक रविवारी मुक्कामाला होते. शासकीय विश्रामगृहात एरवी मोठी वाहने थांबत नाहीत. या कंटेनरमध्ये काय आहे, अशी विचारणा कार्यकर्त्यांनी चालकाकडे केली. त्याने ईव्हीएम मशीन असल्याचे सांगितले.

कार्यकर्त्यांनी ही गोष्ट आघाडीचे प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांच्यासह उपस्थित नेत्यांना सांगितली. परंतु, या कंटेनरच्या दरवाजांना कुठल्याप्रकारचे सील नाही. दरवाजाला लावलेले कुलूप हलक्या प्रतिचे आहे. ही ईव्हीएम वाहतूक संशयास्पद आहे, असे म्हणत कार्यकर्त्यांनी गोंधळ करायला सुरुवात केली. 

सध्या कुठल्याही निवडणुका नाहीत. तरीही ईव्हीएम कोणत्या कारणासाठी घेउन जात आहात, असा खुलासा करण्याची मागणी करण्यात आली. सदर बझार पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिस आणि महसूल अधिकाºयांनी कार्यकर्त्यांचे शंका निसरन केले. मात्र कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार केली. ईव्हीएम विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. 

महाराष्ट्र पुरात अडकला आहे. त्यात ईव्हीएम वाहतूक करण्याची काय गरज आहे. देशभरात ईव्हीएम मशीनबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.  कोणत्याही प्रकारचे सील नसताना ईव्हीएमची वाहतूक केली जात आहे. अशा प्रकारे संशयास्पद पध्दतीने वाहतूक केली जात असल्याची बाब प्रकाश आंबेडकर यांच्या कानावर घातली. त्यांच्या आदेशानुसार आम्ही पोलिसांकडे तक्रार दिली आहे. - आनंद चंदनशिवे,

प्रदेश प्रवक्ते, वंचित बहुजन आघाडी. 

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी बंगळुरू येथील भेल कंपनीकडून ईव्हीएम मागविले जात आहेत. पुणे आणि जळगावसाठी आलेले कंटेनर कोल्हापूर मार्गे जाणार होते. परंतु, महापुरामुळे ते सोलापूरमार्गे आले. शासकीय विश्रामगृहात घडलेल्या प्रकाराबद्दल कार्यकर्त्यांच्या शंकेचे निरसन करण्यात आले आहे. - स्नेहल भोसलेउपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, सोलापूर. 

टॅग्स :SolapurसोलापूरEVM Machineएव्हीएम मशीनvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी