कडब्याच्या पेंढ्यात लपवून अवैध दारूची वाहतूक; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 09:37 PM2020-09-09T21:37:09+5:302020-09-09T21:40:59+5:30

पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई

Transport of illicit liquor concealed in straw; Four and a half lakh items confiscated | कडब्याच्या पेंढ्यात लपवून अवैध दारूची वाहतूक; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

कडब्याच्या पेंढ्यात लपवून अवैध दारूची वाहतूक; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

Next

पंढरपूर : कडब्याच्या पेंड्यामध्ये अवैद्य दारूच्या बाटल्यांची वाहतूक करणार्‍या दोघांना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. या कारवाईत २ लाख १६ हजार रुपये किमतीचा तसेच वाहन अडीच लाख रुपये किंमतीचे, दोन मोबाईल असा एकूण साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली.

अवैध दारू विक्री करण्यासाठी दारू घेऊन एक टेम्पो जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरण अवचर यांना बातमीदराकडून मिळाली होती. त्यानुसार त्यांनी एक पथक कारवाई साठी पाठवले.  मुंढे वाडी येथे संशयास्पद गाडी जाताना सापडली. एम एच ४५ टी ३८६९ या क्रमांकाच्या गाडीमध्ये कडबा होता. कडब्याच्या आत १४०० दारूच्या बाटल्या लपवण्यात आल्या होत्या. या कारवाईत लाख ४ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये २ लाख १६ हजार रुपयाची दारू, अडीच लाख रुपयांचे वाहन, वीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईलचा समावेश आहे.


या प्रकरणी सदानंद दत्तात्रय यादव ( वय २८, रा. घोटी, तालुका माढा ) व सज्जन आदिनाथ थोरात (वय २५, रा. हिवरे तालुका मोहोळ) यांना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस निरीक्षक किरण अवचर, सा. पो. नि. आदिनाथ खरात, पोलीस हवालदार सुधीर शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ नरळे यांनी केली आहे.

Web Title: Transport of illicit liquor concealed in straw; Four and a half lakh items confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.