सोलापुरातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या कोणाची कुठे झाली बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 10:54 IST2021-12-09T10:53:54+5:302021-12-09T10:54:00+5:30

सोलापूर शहर पोलीस आयुक्त हरिष बैजल यांचा मोठा दणका

Transfers of police officers in Solapur; Find out where someone changed | सोलापुरातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या कोणाची कुठे झाली बदली

सोलापुरातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या कोणाची कुठे झाली बदली

सोलापूर : शहर पोलीस आयुक्तालयातील तीन पोलीस निरीक्षकांसह सात अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी केलेल्या या कारवाईमुळे पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे.

सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांची बदली नियंत्रण कक्षाला करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले उदयसिंह पाटील यांची बदली सायबर पोलीस ठाण्यात झाली आहे. सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांची सदर बझार पोलीस ठाण्यात बदली केली आहे.

अन्य अधिकारी पुढीलप्रमाणे कंसात बदली झालेले ठिकाण- फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक बरडे (नियंत्रण कक्ष), सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक इंद्रजीत वर्धन (प्रभारी अधिकारी सलगरवस्ती पोलीस ठाणे), सुरक्षा शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर (सदर बझार पोलीस ठाणे), नियंत्रण कक्षातील नागेश मात्रे (सदर बझार पोलीस ठाणे) अशी बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. रात्री १०.३० नंतर पडलेल्या या बदल्यांच्या आदेशामुळे खळबळ उडाली आहे.

 

 

Web Title: Transfers of police officers in Solapur; Find out where someone changed