शिकावू डॉक्टरावर महाबळेश्वर येथे नेऊन अत्याचार, फोटो व्हायरल करण्याची धमकी

By रूपेश हेळवे | Updated: June 22, 2023 15:33 IST2023-06-22T15:33:26+5:302023-06-22T15:33:45+5:30

कुटुंबातील सहा जणांवर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

trainee doctor was tortured by being taken to mahabaleshwar threatened to make the photo viral | शिकावू डॉक्टरावर महाबळेश्वर येथे नेऊन अत्याचार, फोटो व्हायरल करण्याची धमकी

शिकावू डॉक्टरावर महाबळेश्वर येथे नेऊन अत्याचार, फोटो व्हायरल करण्याची धमकी

रुपेश हेळवे, सोलापूर: वैद्यकीय शिक्षण घेणार्या २३ वर्षीय तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून तिला महाबळेश्वर येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केला. तसेच अत्याचारावेळीचे काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी तरूणासह त्याच्या कुटुंबातील सहा जणांवर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

आरोपीने पीडितेला डिसेंबर २०२२ मध्ये महाबळेश्वरला नेले. तेथे आरोपी नितीन राजप्पा कटके ( वय २४, बसवेश्वर गल्ली, लातूर) याने तिच्यावर अत्याचार केला. तेथून दुसर्या रिसॉटवर नेऊन अत्याचार करत त्यावेळी त्याने फोटो काढले. त्यानंतर काही दिवसांनी ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी पीडितेला जबरदस्तीने आळंदी येथे नेऊन तिला स्वतासोबत लग्न करण्यास भाग पाडले.

याबाबत पीडितेने कुटुंबियांना सांगितले. पीडितेच्या कुटुंबियांनी आरोपीच्या वडिलाला भेटून अत्याचाराचे फोटो डीलिट करण्यास सांगितल्यानंतर यासाठी २० लाख रूपयांची मागणी केली, अशा आशयाची फिर्याद पीडितेने दिली आहे. या फिर्यादीवरून नितीन कटके ( वय २४, रा. लातूर), काशीनाथ कटके, निकेतन कटके, रेष्मा कटके ( सर्व रा. पुणे), किसन, ज्योती यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

Web Title: trainee doctor was tortured by being taken to mahabaleshwar threatened to make the photo viral