शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

दिवाळीत २६ लाख प्रवाशांचा रेल्वे प्रवास; सोलापूरला मिळाले ३६ कोटींचे उत्पन्न

By appasaheb.patil | Published: November 08, 2019 1:03 PM

मध्य रेल्वेचा सोलापूर विभाग : एसटीसह खासगी बसचालकांचीही कमाई सुसाट

ठळक मुद्देदिवाळी सणासाठी आपल्या गावी जाणाºया प्रवाशांमुळे रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती़१ ते ३० नोव्हेंबर २०१९ या कालावधीत सोलापूर विभागातून भारताच्या कानाकोपºयात २५ लाख ८१ हजार २९२ प्रवाशांनी प्रवास केला़ रेल्वेला ३५ कोटी ४३ लाख २ हजार ४१३ रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : भारतामधील १०० सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातील रेल्वे गाड्यांना दिवाळीत प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे़ १ ते ३० नोव्हेंबर २०१९ या कालावधीत सोलापूर विभागातून भारताच्या कानाकोपºयात २५ लाख ८१ हजार २९२ प्रवाशांनी प्रवास केला़ यातून रेल्वेला ३५ कोटी ४३ लाख २ हजार ४१३ रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

दिवाळी किंवा दीपावली हा एक प्रमुख हिंदू सण आहे. हा दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. या सणासाठी संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आदी राज्यांतून प्रवाशांनी सोलापूर विभागातून प्रवास केला.

दिवाळी सणासाठी आपल्या गावी जाणाºया प्रवाशांमुळे रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती़ दरम्यान, सोलापूर विभागामध्ये २१ आॅक्टोबर ते १ नोव्हेंबर २०१९ या दरम्यान दिवाळी सणानिमित्त रेल्वे गाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी होती. गाड्यांमध्ये प्रवासी विनातिकीट प्रवास करू नये, याकरिता विशेष तिकीट तपासणी मोहिमेचे आयोजन केले आहे़ या तपासणीत मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील ७७ रेल्वे स्थानकांवरून धावणाºया मेल, एक्स्प्रेस व पॅसेंजर गाड्यांमधील प्रवाशांकडील तिकिटाची तपासणी केली़ या तपासणीत २८ हजार ८५९ प्रवासी विनातिकीट प्रवास करीत असल्याचे आढळून आले़ त्यांच्याकडून १ कोटी ५१ लाख ८७ हजार ५२५ रुपयांचा दंड वसूल केला.

वाढती प्रवासी संख्या, कमी प्रमाणात असलेल्या रेल्वे गाड्यांमुळे अनेकांना रेल्वेने प्रवास करता आला नाही़ याचा फायदा खासगी बसचालकांनी घेतला़ त्यामुळे खासगी बसचालकांनी तिकीट दरात दहापट वाढ केली होती़ शिवाय महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या एसटी गाड्याही कमी प्रमाणात मार्गावर होत्या़ त्यामुळे घरी परतणाºया प्रवाशांना ऐन दिवाळी सणात चांगला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला  होता.

आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांची विशेष कामगिरी- दिवाळी सणाच्या काळात रेल्वेने प्रवास करणाºयांची संख्या अधिक होती़ त्यामुळे सोलापूर विभागातील प्रत्येक स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती़ या गर्दीचा फायदा घेऊन चोरी अथवा अन्य अनुचित प्रकार करणाºयांवर आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांनी करडी नजर ठेवली होती़ त्यामुळे या दिवाळीकाळात एकही चोरीची घटना सोलापूर विभागात घडली नाही़ प्रवाशांना सुरक्षित व सुखकर प्रवास घडविण्यात आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांनी चांगली कामगिरी केल्याची माहिती आरपीएफचे प्रमुख मिथुन सोनी दिली़

दिवाळीत होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने विभागीय व्यवस्थापक हितेंद्र मल्होत्रा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष नियोजन केले होते़ विशेष गाड्या, तिकीट खिडक्यांच्या संख्येत वाढ व प्रवाशांची सुरक्षा यावर अधिक काम केले होते़ त्यामुळेच रेल्वेला ३५ कोटी ४३ लाख २ हजार ४१३ रुपयांचे उत्पन्न मिळाले़ मागील वर्षीच्या कालावधीपेक्षा यंदाच्या उत्पन्नात चांगली वाढ आहे, असे म्हणावे लागेल.- प्रदीप हिरडे,वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक, मध्य रेल्वे, सोलापूर 

अतिरिक्त तिकीट खिडक्यांमुळे प्रवासी वाढले- मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात दिवाळी सणानिमित्ताने प्रवाशांनी अतिरिक्त गर्दी केली होती. वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या चालविल्या होत्या. या विशेष गाड्यांमुळे आरक्षण तिकीट केंद्रावर आणि अनारक्षित तिकीट कार्यालयात अतिरिक्त तिकीट खिडक्या सुरू केल्या होत्या़ त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाºयांची संख्या वाढली.

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वेDiwaliदिवाळी