शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतून चुकून आलेल्या मुलाचा सोलापुरात झाला उद्धार ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 15:00 IST

तामिळनाडूचे वर्धराज झाले पक्के सोलापूरकर; सोशल शाळेत नोकरी मिळाली..निवृत्तही झाले

ठळक मुद्देवर्धराज हे पाच वर्षांचे असताना तामिळनाडूतून सोलापुरात रेल्वेने चुकून आलेसुमारे ४० वर्षे सोशल शाळेमध्ये वर्धराज यांनी काम केलेअनोळखी व्यक्तीच्या मदतीसाठी जाती-धर्माच्या भिंतीही कोसळल्या

शीतलकुमार कांबळे 

सोलापूर : लहान असताना चुकून रेल्वेत बसून तामिळनाडूतून सोलापुरात आलेला मुलगा सोलापूरकर होऊन गेला. इथेच काम करत निवृत्तही झाला. त्यांचे कुटुंबही आता येथेच राहते. या शहराने त्यांना नाव, काम, कुटुंब दिले. मराठी भाषा येत नसतानाही सोलापूरने त्यांना आपलेसे केले. एखाद्या चित्रपटात शोभावी अशी त्यांची कथा आहे.

वर्धराज हे पाच वर्षांचे असताना तामिळनाडूतून सोलापुरात रेल्वेने चुकून आले. स्टेशनवर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना बालगृहात ठेवले. १९६४ ते १९६९ पर्यंत ते तिथेच राहिले. त्यानंतर सलगर वस्ती येथील शासकीय शाळेमध्ये ते शिकत होते. एकेदिवशी रस्त्यावरून जात असताना वर्धराज यांचा अपघात झाला. शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर सुमारे एक वर्ष शस्त्रक्रिया व उपचार करण्यात आले. डॉ. विनायक चितळे यांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. पुढे डॉ. विनायक चितळे यांनी त्यांना आपल्या रुग्णालयात कामाला घेतले.

काही वर्षांनंतर सोशल संस्थेचे डॉ. महमदअली वडवान हे उपचारासाठी डॉ. चितळे यांच्या रुग्णालयात गेले होते. तिथे वर्धराज यांनी डॉ. वडवान यांची सेवा केली. डॉ. वडवान यांना वर्धराजचा स्वभाव आवडला. त्यांनी वर्धराज याला आपल्या सोशल संस्थेत शिपाई पदावर कामावर घेण्याविषयी डॉ. चितळे यांना विचारले. डॉ. चितळे यांनीही त्यांना होकार दिला. तसेच वर्धराजही सोशल शाळेमध्ये काम करण्यास तयार झाले. त्यानंतर कागदपत्रांची पूर्तता करून वर्धराज यांना शाळेत रुजू करून घेतले. सुमारे ४० वर्षे सोशल शाळेमध्ये वर्धराज यांनी काम केले. ३१ जुलै रोजी ते निवृत्त झाले. यानिमित्त शाळेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

अनोळखी व्यक्तीच्या मदतीसाठी जाती-धर्माच्या भिंतीही कोसळल्यावर्धराज यांना सांभाळण्यासाठी अनेक जण पुढे आले. वर्धराज यांचा धर्म व जात कुठली होती हे न पाहता हिंदू, मुस्लीम तसेच ख्रिश्चन धर्मातील लोकांनी वर्धराज यांना शिकविले, कामाला लावले, त्यांचे लग्नही लावून दिले. एका अनोळखी व्यक्तीसाठी जाती-धर्माच्या भिंतीही गळून पडल्या. बालगृहात असताना वळसंगकर बाई यांनी मराठी शिकवले, सलगर वस्ती येथील शाळेतील शिक्षक सुरेंद्र गायकवाड यांनी त्यांना आपल्या घरी सांभाळले, डॉ. विनायक चितळे यांनी उपचार करून वर्धराज यांना आपल्याच रुग्णालयात कामाला घेतले, डॉ. वडवान यांनी आपल्या शाळेत नोकरी लावली, ख्रिश्चन असणाºया कुसुम केतनी वर्धराज यांचे लग्न लावून दिले. लग्न लावण्यासाठी सिद्राम बंडगर, आखाडे सिस्टर यांनीही मदत केली.

काही वर्षांपूर्वी तामिळनाडूमधील सेलम या जिल्ह्यातील माझ्या गावात गेलो होतो. तिथे माझी फक्त एक मावस बहीण आहे. इतर सर्व नातेवाईकांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूूमध्ये आडनाव नसते. येथे मला स्वामी हे आडनाव बालगृहानेच दिले. माझ्या आयुष्याच्या जडणघडणीत खूप जणांचा वाटा आहे. सोलापूरकरांनी जाती-धर्म विसरून मला मदत केली. मी सध्या होटगी रोड येथील भारतमाता नगरमध्ये राहतो. या शहराने मला सर्व काही दिल्याने आयुष्यभर या शहराचा ऋणी आहे. - वर्धराज स्वामी

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेEducationशिक्षणSchoolशाळा