Traffic police suicide in Madha | माढयात वाहतूक पोलिसाची आत्महत्या
माढयात वाहतूक पोलिसाची आत्महत्या

ठळक मुद्देमाढा पोलीस ठाण्यात झाली नोंदआत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

माढा : माढ्यातील पोलिस वसाहतीमध्ये पोलीस कॉन्स्टेबल सुरेंद्र अजंता कटकदौंड (वय 30) यांनी फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार दि 16 रोजी रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास केल्याची घटना घडली.

दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट असून पत्नीने याबाबतची माढा पोलिसात खबर आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला आहे.

मागील पाच ते सहा महिन्यापूर्वी पंढरपूर येथून ते माढ्यात सेवेसाठी रुजू झाले होते. त्यांच्या पश्चात मुलगी, मुलगा, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. त्यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे. 


Web Title: Traffic police suicide in Madha
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.