शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'काँग्रेससाठी पुढचा काळ कठीण; कार्यकर्त्यांनी संघर्षासाठी तयार रहावे', सुशीलकुमार शिंदे यांनी दिला सल्ला

By appasaheb.patil | Updated: December 28, 2022 16:44 IST

Sushilkumar Shinde : काँग्रेससाठी येणारा काळ कठीण असून कार्यकर्त्यांनी संघर्षासाठी तयार रहावे असे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीकुमार शिंदे यांनी सोलापुरात केले. 

- आप्पासाहेब पाटीलसोलापूर -  महागाई, बेरोजगारी, जातिभेद या विरोधात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा सुरु आहे. या यात्रेत कित्येक किलोमीटर मी ही चाललो आहे. मी जरी ऐंशी, ब्याऐंशी वर्षाचा असलो तरी मी म्हातारा झालो नाही मी अजून जवान आहे. उरलेला काळ सर्वसामान्य जनतेसाठी आणि काँग्रेस पक्षासाठी काम करत काँग्रेसचा झेंडा पुढे घेऊन जाणार आहे, काँग्रेससाठी येणारा काळ कठीण असून कार्यकर्त्यांनी संघर्षासाठी तयार रहावे असे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीकुमार शिंदे यांनी सोलापुरात केले. 

सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष स्थापना दिनानिमित्त काँग्रेस भवन सोलापुर येथे "झेंडा वंदन" कार्यक्रम माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्षा आ. प्रणिती शिंदे, शहर अध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, विश्वनाथ चाकोते यांच्या व मान्यवर नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांच्या प्रचंड उपस्थितीतीत संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी सेवादल पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे पत्र ही देण्यात आले. भारत यात्रेत अडीच महिने चाललेल्याबद्दल इरफान शेख याचाही सत्कार करण्यात आला. यावेळी शहर अध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या अडचणीच्या काळात सुशीलकुमार शिंदे, आ. प्रणिती शिंदे यांनी जी जबाबदारी दिली त्या संधीचे सोने करून पदाधिकारी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सोलापूर महानगपालिकेवर तिरंगा फड़कविणार असल्याचे सांगितले.

यावेळी उद्योगपती दत्ताआण्णा सुरवसे, माजी महापौर सुशीला आबुटे, अरिफ शेख, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, रियाज हुंडेकरी, शिवा बाटलीवाला, प्रविण निकाळजे, तौफीक हत्तुरे, विनोद भोसले, नगरसेविका अनुराधा काटकर, वैष्णवीताई करगुळे, परविन इनामदार, प्रदेश सचिव किसन मेकाले, गुरुजी प्रा.नरसिंह आसादे, मनीष गडदे, सुशील बंदपट्टे, शाहीन शेख यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सेवा दल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे यांनी केले होते.

टॅग्स :Sushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेcongressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र